Ram Shinde News : आमची भाऊबंदकी आता मिटलीयं, आमच्या कोणतेही मतभेद नसून हा आमच्यातील वाद कौटुंबिक विषय असल्याचं सांगत भाजपचे आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांनी आपली खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांच्याशी दिलजमाई झाली असल्याचं जाहीर केलं आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून विखे आणि शिंदे यांच्यात चांगलच वाकयुद्ध रंगत असल्याचं पाहायला मिळत होतं. अखेर आता विखे आणि शिंदे यांच्यात दिलजमाई झाली असल्याचं समोर आलं आहे. जामखेडमध्ये आयोजित बैठकीनंतर राम शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
अजय देवगणच्या वाढदिवशी Maidaan चा शेवटचा ट्रेलर रिलीज; कोण आहेत? सय्यद अब्दुल रहीम
राम शिंदे म्हणाले, आमच्यात कोणतेही मतभेद नाही. आमच्यातील वाद हा कौटुंबिक विषय होता,याची जाहीर वाच्यता होत नसते. आमच्या कुटुंबातील जी काही भाऊबंदकी होती ती मिटली आहे. मागील पाच वर्षातील एकूण आलेल्या अनुभवांचा उहापोह करण्यात आला. याबद्दल उमेदवार सुजय विखे यांनी सर्वांचे समाधान होईल अशी भूमिका मांडली. यावर उपस्थित पदाधिकाऱ्यांचं पूर्ण समाधान झालं असून यापूर्वी जामखेड तालुक्यातून मिळालेल्या मताधिक्यापेक्षा अधिकचे मताधिक्य दिले जाणार असल्याची ग्वाहीच राम शिंदे यांनी दिली आहे.
वंचित बहुजन आघाडी चिन्हापासूनच ‘वंचित’ ! राज्यभरात वेगवेगळ्या चिन्हावर मते मागावे लागणार
तसेच पक्षाने 13 मार्च रोजी सुजय विखे यांना उमेदवारी घोषित केल्यानंतर आता कसलेही मतभेद उरलेले नाहीत, केंद्रीय नेतृत्वाने ‘अब की बार चारसौ पार’चा नारा दिला आहे. त्यामुळे सुजय विखे यांना विजयी करणे हे सर्वांचे लक्ष आहे. नगर दक्षिणेतील सहाही विधानसभा मतदारसंघात आपण विखे यांना जास्तीतजास्त मताधिक्य मिळेल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे.
वंचितने उमेदवारी देताच रमेश बारसकरांवर मोठी कारवाई! शरद पवार गटाकडून हकालपट्टी
दरम्यान, जामखेड तालुका भाजप पदाधिकऱ्यांची प्रचार नियोजन बैठक सुजय विखे आणि राम शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडली. बैठकीनंतर राम शिंदे यांनी प्रचार नियोजन बैठकीचा आढावा सांगितला. नियोजन बैठकीला जामखेड तालुक्यातील पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.