Ahmednagar News : येत्या काळात लोकसभा निवडणूक होणार असून त्या अनुषंगाने राजकीय पक्षांकडून व नेतेमंडळींकडून हालचालींना वेग प्राप्त झाला आहे. नगर दक्षिण लोकसभेसाठी भाजपचा उमेदवार कोण असणाऱ्या वरती चर्चा सुरू असताना खासदार सुजय विखे यांनी मोठे भाष्य केले आहे. भाजपकडून कोणाला संधी मिळणार हे मला माहीत नाही पक्ष कोणाला तिकीट देणार हे देखील मला माहित नाही. मात्र, या निवडणुकांच्या अनुषंगाने आपण गाव पातळीवर काम सुरू केले पाहिजे. निवडणुकांच्या जबाबदाऱ्या वाटून घेतल्या पाहिजे. मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवायचे हा उद्देश ठेवून सर्वांनी काम सुरू ठेवावे असे देखील यावेळी बोलताना खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) म्हणाले आहेत.
नगर तालुका खरेदी विक्री संघ तसेच जिल्हा खरेदी विक्री संघाचे निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेल्या संचालकांचा सत्कार व भिंगार अर्बन बँक निवडणुकीत भरघोस मतांनी निवडून आलेल्या संचालकांचा सत्कार खासदार विखे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी मंचावरून विखे यांनी येणारे लोकसभा निवडणुकीवर देखील भाष्य केले. यावेळी बोलताना विखे म्हणाले की, लोकसभा निवडणूक असून भाजपकडून कोणाला तिकीट मिळणार कोण उमेदवार असणाऱ्यांबाबत आपल्याला काही माहिती नाही. आपण निवडणुकांच्या अनुषंगाने जबाबदारी वाटून घेतल्या पाहिजे आपल्या सर्वांचा एकच उद्देश असणार तो म्हणजे येणाऱ्या 2024 मध्ये पुन्हा एकदा मोदी यांना देशाचे पंतप्रधान बनवण्याचा, असे यावेळी विखे म्हणाले.
यावेळी विरोधकांवर बोलताना विखे म्हणाले की, सध्या तुम्ही बातम्यांमध्ये पाहताय की लोक आता बोलू लागली की ज्यांनी गेले साडेचार वर्षे बोलले नव्हते ते आता आरोप देखील करू लागले या सगळ्यांच्या आरोपाला फार काही गंभीर्याने घेऊ नका त्यांना काय पाहिजे आहे मला माहिती आहे त्यांना योग्य वेळी त्याचा पुरवठा देखील केला जाईल असे देखील यावेळी विखे यांनी शाब्दिक टोला लगावला.
प्रफुल्ल पटेल तब्बल 483 कोटींचे मालक! देवरा, अशोक चव्हाणांचीही संपत्ती कोट्यावधींच्या घरात
यावेळी रामायणाचा उल्लेख करताना विखे म्हणाले, रामायणामध्ये एक पात्र होते ते म्हणजे मंत्रा. या पात्राचं एकच काम होतं ते म्हणजे या एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती जाणे चिटकणे कसा एखाद्याचा सुखी संसार उध्वस्त होईल असं त्या मंत्राच काम असायचं रामायणात रावण मेला मात्र मंत्रा मेली असं कधीच दाखवलं नाही. अशा अनेक मंत्रा या नगर तालुक्यात आहेत. या मंत्रा प्रत्येक तालुक्यात तालुक्यात गावात जाऊन विष कालवण्याचे काम करत आहे, मग कोणत्याही विकास कामाच्या योजना असेल कांद्याचा प्रश्न असेल दुधाचा प्रश्न असेल उद्याचा प्रश्न हा प्रलंबित आहे मात्र, आपण स्वतः केंद्रीय मंत्री अमित शाह यांची दोनदा भेट घेत कांदा प्रश्न चर्चा केली असे देखील यावेळी विखे म्हणाले आहेत.