Download App

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांकडून वेगळ्या अपेक्षा काय? मंत्री विखेंचा लंकेंवर हल्लाबोल

Radhakrishna Vikhe On Nilesh Lanke : लोकसभा निवडणुकीचे (Loksabha Election 2024)वारे चांगलेच वाहू लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. अहमदनगर लोकसभा निवडणुकीत (Ahmednagar Lok Sabha)महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके आणि महायुतीचे उमेदवार सुजय विखे (Sujay Vikhe)यांचा झंझावाती प्रचार सुरु झाला आहे. मेळावे, बैठकांचा धडाका दोन्ही उमेदवारांकडून सुरु आहे. त्यातच आता जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe)यांनी निलेश लंके (Nilesh Lanke)यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. मंत्री विखे यांनी निलेश लंके यांना गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचा आरोप केला आहे.

सातारा सैनिक शाळेत विविध पदांसाठी भरती सुरू, महिन्याला 38,000 रुपये पगार

गेल्या काही दिवसांपूर्वी महायुतीचे उमेदवार असलेले सुजय विखे यांना, गोळी घालून जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दलची ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यावर मंत्री विखे यांना प्रश्न केला असता, केला असता ते म्हणाले की, सद्यस्थितीमध्ये वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न झाला. तसेच आता थेट गोळ्या घालण्यापर्यंतची भाषा ही केली जाऊ लागली आहे. या घटनेचा निषेध केला पाहिजे.

आधी ईडी आता सीबीआय! BRS नेत्या के. कविता पुन्हा गजाआड; कोणत्या प्रकरणात अटक?

मंत्री विखे म्हणाले की, नगर जिल्ह्याला एक वेगळा राजकीय वलय आहे. अनेक नेत्यांनी या जिल्ह्याचं नेतृत्व केलं आहे. यापूर्वी कधीही अशी परिस्थिती नव्हती. मात्र मुळात ज्यांची पार्श्वभूमी ही गुन्हेगारीची असेल गुन्हेगारांना सांभाळणारी असेल, त्यांच्याकडून वेगळी अपेक्षा काय करणार? अशा शब्दात विखे यांनी निलेश लंके यांना खडे बोल सुनावले.

तसेच राज ठाकरे यांनी नुकताच महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला, त्यांच्या या पाठिंब्याबद्दल त्यांचे मनापासून खूप आभार व्यक्त केले. मनसेने हा निर्णय दिलसे घेतला आहे. त्यांचे संघटन, कौशल्य या सर्व बाबींचा महाराष्ट्राला निश्चित फायदा होईल, असेही यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

त्याचबरोबर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वाहनाचा अपघात झाला, त्यावरुन अनेक तर्कवितर्क देखील लावले जात होते. अपघात आहे की घातपात असा संशय देखील यावेळी व्यक्त केला जात होता. यावर मंत्री राधाकृष्ण विखे यांना प्रश्न केला असता विखे पाटील म्हणाले की, या गोष्टीवरती नाना हेच खरं उत्तर देऊ शकतात.

महाराष्ट्रात राजकारणाची पातळी अद्याप एवढी खालवली नाही. नाना हे माझे मित्र आहेत, पक्षाचे मतभेद जरी असले तरी कोणी घातपात करेल, अपघात करेल अशी काही वस्तुस्थिती नाही. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील भाष्य केले आहे. यामुळे आपल्या वक्तव्यांनी अनेक गैरसमज निर्माण करु नये. कोणी अशा घटना करत नाहीत, असेही यावेळी मंत्री विखे म्हणाले.

follow us

वेब स्टोरीज