Radhakrishna Vikhe : पडळकरांनी स्वतःला आवर घालावा; विखे पाटलांनीही सुनावलं

Radhakrishna Vikhe : पडळकरांनी स्वतःला आवर घालावा; विखे पाटलांनीही सुनावलं

Radhakrishna Vikhe : भाजप नेते आ. गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर केलेल्या टीकेवरून राज्यभरात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. अजित पवार गटाचे नेते प्रचंड संतापले असून पडळकर यांच्या विरोधात ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहे. पडळकरांच्या वक्तव्याने भाजपही (BJP) बॅकफूटवर गेले असून पडळकरांनी अशी वक्तव्य टाळावीत असा सल्ला त्यांना भाजप नेत्यांकडून दिला जात आहे. यामध्ये आता महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) यांची भर पडली आहे. विखे पाटील यांनी स्वतःला आवर घालावा, अशा शब्दांत पडळकरांना सुनावले.

गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि अजित पवार यांच्यातील राजकीय संघर्ष अनेक दिवसांपासूनचा आहे. ते एकमेकांविरोधात निवडणुकीत उभे होते. आपण आता एकत्र असल्याने त्यांनी विधान करताना स्वतःला आवर घालावा. सरकारच्या स्थिरतेसाठी आपसातले मतभेद बाजूला ठेवावेत, असे मंत्री विखे म्हणाले.

अजितदादांना फडणवीसांचा सपोर्ट; ‘त्या’ वक्तव्यावरून पडळकरांना फटकारलं

मुख्यमंत्री शिंदेंचाच विजय होणार

यानंतर त्यांनी सामनातील अग्रलेखावरही टीका केली. ज्यांना पक्ष सांभाळता आला नाही त्यांनी अगोदर स्वतःची विश्वासार्हता निर्माण करावी. एखाद्या वर्तमानपत्रातून टीका करणे जनमत नाही. जनतेचा विश्वास गमावलेल्या लोकांच्या टीकेने काहीही परिणाम होणार नाही. उलट सरकार अधिकच मजबूत होईल, असा खोचक टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. यावरही विखे पाटलांनी भाष्य केले. ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बाजू खरी आहे. शेवटी सत्याचाच विजय होतो. आम्हाला तशी खात्री आहे. त्यामुळे यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाच विजय होईल असा विश्वास विखे (Radhakrishna Vikhe) यांनी व्यक्त केला.

पडळकर काय म्हणाले होते ?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करताना पडळकर म्हणाले होते, की त्यांची (अजित पवार) भावना आमच्याबद्दल स्वच्छ नाही. त्यामुळं त्यांना पत्र देण्याची गरज नाही. लबाड लांडग्याचं पिल्लू आहे ते. त्यामुळं त्यांना आम्ही मानत नाही. म्हणून आम्ही त्यांना पत्र दिलं नाही आणि यापुढेही देण्याची आवश्यकता वाटत नाही. ज्यांच्याकडून आम्हाला न्याय मिळतो त्या दोघांना मी पत्र दिलं आहे.

Ahmednagar Politics : 2024 मध्ये कुणाचं सरकार? तनपुरेंनी स्पष्टच सांगितलं

पडळकरांचे वक्तव्य चुकीचेच – फडणवीस

दरम्यान, गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली. गोपीचंद पडळकर यांनी केलेले वक्तव्य अयोग्य आहे. अशा प्रकारचं वक्तव्य करणं चुकीचं आहे. तिन्ही पक्षातील नेते, कार्यकर्ते आणि तिन्ही पक्षातील आमदारांनी तिन्ही पक्षातील नेत्यांचा सन्मान ठेवला पाहिजे. अशा प्रकारच्या भाषेचा उपयोग करू नये, अशा शब्दांत फडणवीस यांनी पडळकर यांनी फटकारले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube