Download App

भागानगरे हत्याकांड! तिसऱ्या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

Ahmednagar Murder Case Update : अवैध धंद्याची पोलिसांना माहिती देत असल्याच्या कारणावरुन अहमदनगर (Ahmednagar)शहरातील बालिकाश्रम रोडवरील ओंकार भागानगरे या तरुणाचा तलवारीने खून करण्यात आला. या हत्याकांड्यानंतर आरोपी पसार झाले होते. दरम्यान या हत्याकांडातील दोन आरोपी हैदराबादला (hyderabad)पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर या प्रकरणातील फरार संदीप गुडा या आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. दरम्यान या हत्याकांडाने नगर शहरासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. (Onkar bhaganare murder case ahmednagar)

पवारांचा शिलेदार, केसीआर यांच्या गळाला, पक्ष सोडताना भालकेंचे गंभीर आरोप

दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी नगर शहरातील ओंकार भागानगरे या तरुणाचा बालिकाश्रम रोडवर तलवारीने खून करण्यात आला. पोलिसांना अवैध धंद्याची माहिती देत असल्याच्या कारणावरुन हा खून करण्यात आल्याची माहिती समोर आली. त्यानंतर ओंकारच्या कुटुंबियांनी जिल्हा अधीक्षक कार्यालयासमोरच ठिय्या मांडला होता. आपल्या मुलाच्या मारेकऱ्यांना तातडीने अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

भीषण अपघात! ट्रक-बसची समोरासमोर धडक; आठ जणांचा मृत्यू

घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आरोपींच्या शोधार्थ रवाना झाले होते. या हत्याकांडातील आरोपींना पुण्यातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. गणेश हूच्चे व नंदू बोराटे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर या प्रकरणातील संदीप गुडा हा आरोप फरार होता अखेर या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. दरम्यान गुडा याला पुण्यातून अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कामगिरी केली. हा गुन्हा का करण्यात आला यामागे नेमका कोणाचा हात आहे का? अशा अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे येत्या काळात समोर येतील.

Tags

follow us