भीषण अपघात! ट्रक-बसची समोरासमोर धडक; आठ जणांचा मृत्यू

भीषण अपघात! ट्रक-बसची समोरासमोर धडक; आठ जणांचा मृत्यू

Ratnagiri Road Accident : जिल्ह्यातील दापोली-हण्र मार्गावर एक ट्रक आणि खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसच्या (Truck-Bus accident)समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात आठ प्रवाशांचा मृत्यू (8 Death)झाला आहे. यामध्ये बसमधील चालकाचा देखील मृत्यू झाला आहे. त्याचवेळी अपघातामध्ये सहाजण प्रवासी जखमी (6 Injured)झाल्याची माहिती समोर आली आहे. दापोली (Dapoli)येथील रुग्णालयात जखमींवर उपचार सुरु आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की, प्रवासी बसच्या समोरील भागाचा अक्षरशः चेंदामेंदा झाल्याचे पाहायला मिळाले. अपघात होताच ट्र्क चालक आणि त्याचा सहकारी पसार झाला. (ratnagiri-truck-bus-accident-8-killed-6-injured)

पवारांनी केलं तर मुत्सद्देगिरी आणि शिंदेंनी केलं तर गद्दारी कशी काय? फडणवीसांचा राष्ट्रवादीला सवाल

हा अपघात रविवारी (दि.25) दुपारी दोनच्या दरम्यान झाला. बस प्रवाशांना घेऊन दापोलीमधून आंजर्लेकडे निघाली होती. आसूद जोशीआळी येथील वळणावर समोरुन येणाऱ्या ट्रक आणि बसची जोराची धडक बसली. समोरुन येणारी ट्रकचा वेग अधिक असल्याने बस काही अंतरापर्यंत फरपटत गेली. हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये बसचा चक्काचूर झाल्याचे दिसत आहे. या अपघातात बसमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघांचा रुग्णालयात आणि एका महिलेचा डेरवण येथे नेताना मृत्यू झाला.

आषाढीपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी घेतलं विठुरायाचे दर्शन, ‘वारकऱ्यांची जबाबदारी सरकारची’

या अपघाताची माहिती मिळताच दोपोली पोलीस निरीक्षक विवेक आहेर यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातामध्ये बसचालक अनिल सारंग (वय 45 रा. हण्र), संदेश कदम (वय 55), स्वरा संदेश कदम (वय 8), मारियम काझी (वय 64), फराह काझी (वय 27 सर्व रा.पाडले), वंदना चोगले (वय 34, रा. पाजपंढरी), सामीया इरफान शिरगांवकर अशा आठ जणांचा मृत्यू झाला आहे.

अपघातामध्ये सपना संदेश कदम (वय 34 रा.अडखळ), श्रद्धा संदेश कदम (वय 14,रा.अडखळ), विनायक आशा चोगले (रा. पाजपंढरी), भूमी सावंत (वय 17), मुग्धा सावंत (14), ज्योती चोगले (वय 9, रा.पाजपंढरी) यांच्यावर उपजिल्हा रुग्णालय आणि खासगी रुग्णालयांत उपचार सुरु आहेत.

या अपघातामध्ये अडखळ येथील कदम कुटुंबावर मोठी शोककळा पसरली आहे. या अपघातामध्ये वडील आणि मुलीचा मृत्यू झाला आहे. तर पत्नी आणि एक मुलगी जखमी झाली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube