Download App

आमदार जगतापांचे नामांतरानंतर आता जिल्हा विभागजनासाठी प्रयत्न!

Sangram Jagtap News : अहमदनगर शहराच्या नामांतराची मागणी आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ahilyanagar) यांच्याकडे केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी राज्य मंत्रिमंडळाने नगरच्या नामांतराला मंजुरी दिली आहे. आता नामांतर झालं जिल्हा विभाजनासाठी प्रयत्न करणार असल्याचं आमदार संग्राम जगताप यांनी स्पष्ट केलं आहे. राज्य सरकाकडून अहमदनगरच्या नामांतराचा निर्णय घेण्यात आल्यानंतर जगताप यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.

अजय देवगणचा ‘शैतान’ लवकरच गाठणार 100 कोटींचा टप्पा; सहाव्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी

आमदार संग्राम जगताप म्हणाले, मागील अधिवेशनापासून अहमदनगरच्या नामांतराचा पाठपुरावा आम्ही केला होता. अनेकांची इच्छा होती की, अहमदनगरचं नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर व्हावं. याआधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहिल्यानगरची घोषणा केली होती. त्यानंतर आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी तत्काळ नगरविकास खात्याकडे प्रस्तावाबाबत आदेश दिले. त्यानंतरच मंत्रिमंडळात हा निर्णय घेण्यात आल्याचं संग्राम जगताप यांनी सांगितलं आहे.

BJP Candidate List : सुजय विखे हे राम शिंदे यांना ठरले भारी

तसेच आचारसंहिता कधीही लागू शकते याची शक्यता असल्याने आम्ही दोन दिवसांपूर्वी अहमदनगरच्या नामांतराबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे लेखी स्वरुपात मागणी केली होती. त्यानंतर दुसऱ्याचं दिवशी हा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. नामांतर झालं आता जिल्हा विभाजनासाठी प्रयत्न करणार असल्याचं संग्राम जगताप यांनी सांगितलं आहे.

मागील काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगरच्या नामांतराबाबत मोठी घोषणा केली होती. अहमदनगरचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी असं करण्यात यावं, अशी मागणी सातत्याने केली जात होती. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका कार्यक्रमात अहिल्यादेवीनगरची घोषणा केली होती. त्यानंतर आता नामांतराला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली आहे.

follow us