मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सरकारवर दबाव आणणार; आमदार संग्राम जगतापांचे मोठे विधान

  • Written By: Published:
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सरकारवर दबाव आणणार; आमदार संग्राम जगतापांचे मोठे विधान

Sangram Jagtap on Maratha reservation : मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. अनेक गावांमध्ये नेत्यांना बंदी करण्यात आली. मात्र, मराठा आरक्षणाचा तिढा अद्याप सुटला नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दुसऱ्यांदा आमरण उपोषण सुरू केलं. या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. या आंदोलनाला विरोधकांनी पाठिंबा दिलाच आहे. मात्र, आता सत्ताधारी महायुतीतील अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देत मोठे विधान केलं. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्य सरकारमध्ये राहून आम्ही दबाव आणत राहू, असं विधान त्यांनी केलं.

महेश मांजरेकरांविरोधात ‘पॉस्को’ अंतर्गत गुन्हा दाखल करा; बालहक्क आयोगाचे आदेश 

जरांगे पाटलांनी सरकारला चाळीस दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. या चाळीस दिवसात मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या अन् आरक्षण द्या, अशी मागणी त्यांनी केली. मात्र, सरकारने याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळं मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाने आर-पारची लढाई सुरू केली. जरांगेंनी पुन्हा उपोषण सुरू केल्यानंतर अनेक ठिकाणी मराठी समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरू केलं. नगर तहसील कार्यालयावर मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाचे साखळी उपोषण सुरू आहे. या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. आज महापालिकेच्या नगरसेवकांनी आंदोलनाला पाठिंबा देत आपली भूमिका मांडली. या आंदोलनाला आमदार संग्राम जगताप यांनीही पाठिंबा दिला.

यावेळी बोलतांना जगताप म्हणाले, आम्ही सुरुवातीपासूनच मराठा समाजाला आरक्षण मिळाले, यासाठी आग्रही भूमिका मांडली आहे. मनोज जरांगे पाटील हे आंदोलनाला चांगली दिशा देत आहेत. ते ज्या प्रमाणे आंदोलनाला दिशा देतील, त्या पद्धतीने आम्ही कार्यावाही करत राहू. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्य सरकारमध्ये राहून आम्ही दबाव आणत राहू. विशेष म्हणजे अधिवेशन बोलावू. त्यात मराठा आरक्षणावर सकारात्मक चर्चा करावी. यानंतर राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करावी. यासाठी आम्ही राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार आहोत.

आमदार संग्राम जगताप, उपमहापौर गणेश भोसले, नगरसेवक मनोज कोतकर, अविनाश घुले, कुमार वाकळे, मदन आढाव, दीपाली बारस्कर, संपत बारस्कर, शाम नळकांडे, रुपाली वारे, रवींद्र बारस्कर, विनीत पाऊलबुधे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, माजी महापौर शीला शिंदे, शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम, माजी नगरसेवक बाळासाहेब पवार, निखिल वारे, अजय चितळे, अजय बारस्कर, अजिंक्य बोरकर, सुरेश इथापे, सुरेखा सांगळे, अनुराधा येवले आदी आंदोलनता सहभागी झाले होते.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी विविध समाजातून पाठिंबा मिळत आहे. शहरातील सय्यद हाजी हमीद टाकिया ट्रस्टचे अध्यक्ष सय्यद साबीर अली मन्सूर अली यांनी मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. यावेळी त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशी भूमिका मांडली. या पाठिंब्याचे मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाने स्वागत केले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube