Download App

राजळेंना शह देण्यासाठी ढाकणे झाले अॅक्टिव्ह; रस्त्याच्या कामावरून आरोप-प्रत्यारोप

Pratap Dhadkne Vs Monika Rajle : आगामी काळात विधानसभा निवडणुका या होणार आहे. निवडणुकांच्या अनुषंगाने आता सायलेंट मोडवर असलेले नेतेमंडळी देखील आता अॅक्टिव्ह होऊ लागले आहे. यातच शेवगाव पाथर्डी मतदार संघात सध्या भाजपच्या मोनिका राजळे (Monika Rajale) या विद्यमान आमदार आहे. मात्र, येणाऱ्या निवडणुकीत राजळे यांना शह देण्यासाठी आता शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे (Pratap Dhakne) हे चांगलेच सक्रिय झाले आहेत. जनतेचे प्रश्न घेऊन ते आता रस्त्यावर उतरू लागले आहे. यातच त्यांनी लोकांच्या भेटीगाठी घेत विधानसभेसाठी मोर्चेबांधणी सुरु केल्याचे दिसून येत आहे.

Rohit Pawar : ‘भाषणं देण्यापेक्षा पद सोडा’; रोहित पवारांनी भुजबळांना सुनावलं

राजळे- ढाकणेंमध्ये आरोप-प्रत्यारोप :
पाथर्डी तालुक्यातील करोडी-टाकळीमानुर रस्त्याची दुरावस्था झाली आहे. हा रस्ता दुरुस्त व्हावा नव्यान व्हावा यासाठी अनेक वेळा मागणी करण्यात आली. दरम्यान, यासाठी ढाकणे यांनी रास्तारोको आंदोलन केले. यावेळी ढाकणे यांनी आमदार मोनिका राजळे यांचा नामोल्लेख टाळून त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

Tripti Dimri : ‘ॲनिमल’ चित्रपटाच्या रिलीजनंतर प्रकाशझोतात आलेली तृप्ती डिमरी आहे तरी कोण?

बोलताना ढाकणे म्हणाले तालुक्‍यात स्व. केद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांनी रस्ते, वीज, जलसंधारण ही महत्वाची कामे केली. त्यानंतर अनेकांनी सत्ता उपभोगली. गेल्या पंधरा वर्षांत ज्यांनी सत्ता भोगली त्यांनी कोणतेही ठोस काम केले नाही. मला लोकप्रतिनिधींचे काम काय असतं ते समजेना. गेल्या 20 वर्षात एकतरी तलाव तयार केला का? असेल मला दाखवा, मी थांबायला तयार आहे. जनतेने हे सर्व ओळखले आहे. अशा शब्दात रस्त्याच्या दुरावस्थेवरून ढाकणे यांनी अप्रत्यक्षरीत्या राजळेंना घेरणायचा प्रत्यन केला आहे.

ईडीचे धाडसत्र! दादरमधील प्रसिध्द साडीचे दुकान भरतक्षेत्रवर छापा, इतर पाच ठिकाणीही झाडाझडती

राजळेंचाही ढाकणेंवर पलटवार :
करोडी ते टाकळीमानूर रस्त्याचे काम मंजूर झालेले असून केवळ तांत्रिक बाबीमुळे ठेकेदारास कार्यारंभ आदेश मिळला नाही. मात्र, लवकरच रस्त्याच्या कामाला सुरवात होईल. मात्र, आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विरोधक ज्या रस्त्याचे काम मंजुर झाले आहे, त्यासाठी रास्ता रोको आंदोलन करून काम आम्हीच काम मंजुर केले असा बनाव करत आहे. मात्र जनता सुज्ञ असून, काम करणारे कोण व राजकारण करणारे कोण, हे जनतेला माहिती, अशा शब्दांत आमदार मोनिका राजळे यांनी ढाकणे यांना प्रत्युत्तर दिले आहे.

Tags

follow us