Ahmednagar News : अहमदनगर शहरांमधून उड्डाणपूलाचे काम पूर्ण होऊन वर्ष उलटून गेले. मात्र याच उड्डाणपूलाच्या खाली असणारा चांदणी चौक आहे. या चौकातूनच शहरातून सोलापूरकडे जाणारा मुख्य रस्ता जातो. मात्र या ठिकाणी सध्या नागरिकांची फजिती होत आहे. कारण दोन्ही बाजूने नाल्यांचे काम ठेकेदाराने अर्धवट सोडले आहे.
आव्हाडांचं जशास तसं उत्तर, मुख्यमंत्र्याचे छोटा राजनच्या सहकाऱ्यासोबतचे फोटोच दाखवले…
त्यामुळे उघड्या असलेल्या नाल्यामध्ये अनेकदा अपघात होत असतात. त्यातच आज दुपारी रस्त्याचे डांबर घेऊन जात असलेल्या डंपर या नाल्यामध्ये अडकून पलटी झाला. मात्र सुदैवाने याद कुठलीही जीवित हानी झाली नाही. या ठेकेदाराच्या चुकीमुळे अनेकदा अपघात होतात. काही जण जखमी होतात मात्र याकडे प्रशासन जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करीत आहेत.
Gunratan Sadavarte : नितेश राणेंनंतर सदावर्तेंकडूनही ठाकरे अन् हल्लेखोरांचे लोकेशन तपासण्याची मागणी
तर आज दुसरीकडे जिल्ह्यात पंतप्रधान मोदी आलेले होते. मात्र अशा प्रकारे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे दुर्घटना घडतच आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)आज शिर्डी (Shirdi)दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी साईंचे दर्शन घेतले आणि निळवंडे धरणासह विविध प्रकल्पांचे लोकार्पण केले. त्यानंतर मोदी सभेच्या ठिकाणी पोहोचले. तेथे त्यांनी प्रचंड अशा जनसमुदायाला संबोधित केलं.