Gunratan Sadavarte : नितेश राणेंनंतर सदावर्तेंकडूनही ठाकरे अन् हल्लेखोरांचे लोकेशन तपासण्याची मागणी
Gunratan Sadavarte : गुणरत्न सदावर्तेंच्या (Gunaratna Sadavarte) गाड्यांची तोडफोड प्रकरणावरून राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. मराठा समाज सध्या आरक्षणावरून (Maratha Reservation Protest) आक्रमक झाला आहे. त्यात नितेश राणे यांनी देखील या प्रकरणी ठाकरेंवर आरोप केला आहे. तसेच ठाकरे अन् हल्लेखोरांचे लोकेशन तपासण्याची मागणी केली.
काय म्हणाले गुणरत्न सदावर्ते?
या प्रकणावर बोलताना सदावर्ते म्हणाले की, पोलीस आयुक्त यांची भेट घेतली त्यांच्याशी चर्चा केली. ज्यांनी हल्ला केला ते मामुली आणि चिल्लर आहेत. त्यांच्यावर मी बोलणार नाही. त्यांच्या मागे असणाऱ्या मास्टर माईंडवर बोलेल. तसेच सुप्रिया सुळे म्हणालेल्या वकिलाचा करेक्ट कार्यक्रम होणार तो हाच कार्यक्रम आहे का ? असा सवाल करत त्यांनी केला आहे.
Disqualification Mla : शिंदे गटाचा मोठा डाव; विधानसभा अध्यक्षांकडे केली ‘ही’ मागणी
उद्धव ठाकरे आणि ज्यांनी हल्ला केला त्यांचे लोकेशन तपासा अशी मागणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार हे जरांगे समर्थक आहेत. जरांगे मागत असलेले आरक्षण हे कायदा विरोधी आहे. आम्ही आरक्षण विरोधी समितीची स्थापना केली आहे. मी प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात जाणार आहे असं ते म्हणाले आहे.
स्वतःती गाडी जाळली, सदावर्तेंची फोडली, तुरुंगातही गेला : मराठा आरक्षण आंदोलनाचा ‘साबळे पॅटर्न’
काय म्हणाले होते नितेश राणे?
सदावर्तेंच्या गाडीच्या तोडफोड प्रकरणी राणे म्हणाले की, सदावर्तेंची गाडी फोडणारे आरोपी काल मातोश्रीवर होते. हा नियोजित हल्ला होता. याचा तपास व्हावा. त्याचबोबर जरांगेंना बदनाम करण्याचा कट मातोश्रीवर शिजतोस का? याचीही चौकशी करा. आरोपी मातोश्री परिसरात फिरत होते. तर संजय राऊतही बोलले होते. राज्यात दंगली घडतील. त्या याच आहेत. अस आरोप राणेंनी केला आहे.