Download App

भंडारदर्‍यात होणार भारतातील पहिले ‘वॉटर म्युझियम’; तांबेंच्या संकल्पनेला फडणवीसांचा होकार

Water Museum : अहमदनगर जिल्ह्याची जीवनदायिनी आणि शेतकरी वर्गासाठी वरदान ठरलेले भंडारदरा धरणाला लवकरच १०० वर्षे पूर्ण होणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यातच आता भंडारदरा येथे भारतातील पहिले ‘वॉटर म्युझियम’ सुरू करण्याचा प्रयत्न आमदार सत्यजित तांबे यांनी केला आहे.

याबाबत त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत या प्रकल्पाबाबत पत्रव्यवहार केला. फडणवीस यांच्याकडून यासाठी सकारात्मक प्रतिसाद आला असून या वॉटर म्युझियम सुरू करण्यासाठी कार्यवाही करावी असे आदेश देखील फडणवीस यांनी दिले आहे. याबाबत खुद्द सत्यजित तांबे यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.

नेमकं काय म्हंटले आहे ट्विटमध्ये..
उत्तर अहमदनगर जिल्ह्याची जीवन वाहिनी असलेल्या प्रवरा नदीवरील भंडारदारा धरणाला लवकरच १०० वर्षे पूर्ण होत आहेत. भंडारदारा धरण नसते तर काय झाले असते? याची कल्पनासुध्दा नगर जिल्ह्यातील लोक करू शकत नाहीत. सह्याद्रीच्या कुशीतील भंडारदरा परिसर हा महाराष्ट्रासह देश-विदेशातील पर्यटकांना देखील खुणावत असतो.

राहुरीत लव्ह जिहाद! क्लासेसच्या नावाखाली सुरु होते धर्मांतर, शिक्षिकेसह चौघांना अटक

भंडारदारा धरणाच्या शतकपूर्ती निमित्त एक भव्य कार्यक्रम करण्याचा आमचा मानस आहे. त्या निमित्त या परिसरात भारतातील पहिले “वॉटर म्युझियम” उभारण्यासाठी जलसंपदा विभाग व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांनी संयुक्त विद्यमाने जागा व निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी जलसंपदा मंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजींकडे केली. देवेंद्रजींना ही संकल्पना खूप आवडली व त्यांनी तातडीने कार्यवाही सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

Tags

follow us