Download App

Ahmednagar : आंदोलनातून भाजपाची लक्षवेधी! शिंगणापूर देवस्थानच्या कारभाराची होणार चौकशी

Ahmednagar News : देशभरात प्रसिद्धी पावलेल्या शनिशिंगणापूर (ता. नेवासे) देवस्थानात भ्रष्टाचारी कारभाराचा (Ahmednagar News) मुद्दा उपस्थित करत स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी मोठे आंदोलन केले होते. या आंदोलनाची दखल घेत माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, तालुकाध्यक्ष आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी थेट केंद्रीय मंत्री भागवत कराड, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना माहिती दिली होती. त्यानंतर बावनकुळे यांनी थेट विधानपरिषदेत लक्षवेधी उपस्थित करत  या प्रकाराला वाचा फोडली. या प्रकरणात जब शनि महाराज की लाठी चलती है तो आवाज नहीं होता, असे म्हणत चौकशी करण्याचे आश्वासन राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. या आश्वासनानंतर नेवासा तालुक्यातील राजकारणाने वेग घेतला आहे.

श्री क्षेत्र शनिशिंगणापूर देवस्थानमध्ये होत असलेला कोट्यवधींचा भ्रष्टाचाराची चौकशी सचिव दर्जाचा अधिकारी करणार असून श्री शनेश्वर देवस्थान विश्वस्त अधिनियम २०१८ ची अंमलबजावणी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मंगळवारी विधानपरिषदेत शनि शिंगणापूर येथील श्री शनेश्वर संस्थान येथे विश्वस्त मंडळाच्या परवानगीने कोट्यवधींचा भ्रष्टाचार सुरू असल्याचा प्रकार भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित केला होता. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी करण्याचे तसेच सभागृहात पारित झालेल्या कायद्याची अंमलबजावणी करू अशी माहिती दिली.

Ahmednagar News : अल्पवधीत श्रीमंतीचं आमिष, सर्वसामान्य अडकताय शेअर मार्केट ट्रेडिंग कंपन्यांच्या जाळ्यात

शनिशिंगणापूर येथील श्री शनैश्वर देवस्थानमध्ये विश्वस्त मंडळाने अनधिकृतपणे १८०० कामगारांची भरती केली. ही संख्या गरजेपेक्षा कितीतरी पट जास्त असून यातील शेकडो कामगारांना घरी बसून पगार दिला जात आहे. मंदिराच्या चौथाऱ्यावर दर्शनासाठी ५०० रुपयांची बनावट पावती छापून दोन कोटी रुपये उकळण्यात आले. देवस्थानला मिळालेले दान एका खासगी शिक्षण संस्थेला देण्यात येत आहे. २४ तास वीजपुरवठा असताना महिन्याला ४० लाख रुपयांचे डिझेल जाळण्यात आले. मंदिराच्या सुशोभिकरणासाठी २० कोटींचा निधी देण्यात आला होता पण ५० कोटी खर्च करूनही अद्यापही ५० ते ६० टक्के काम शिल्लक असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

२०१८ मध्ये भाजप सरकारने श्री शनेश्वर देवस्थान ट्रस्ट विश्वस्त व्यवस्था अधिनियम २०१८ हा कायदा दोन्ही सभागृहांमध्ये मंजूर केला होता. त्याची तातडीने अंमलबजावणी करावी अशी विनंती बावनकुळे यांनी सभागृहात केली. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सचिव दर्जाचा अधिकारी नेमून या प्रकरणाची चौकशी करण्याचे, संस्थांच्या सर्व व्यवहारांचे ऑडिट करण्याचे व लवकरात लवकर शनेश्वर देवस्थान विश्वस्त अधिनियम २०१८ ची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात सखोल तपास करण्याचे आश्वासन दिल्यानंतर सोनई गावात फटाके फोडून या निर्णयाचे फटाके फोडून स्वागत करण्यात आले.

Ahmednagar News : भूकंप सदृश्य धक्क्यांनी हृदयाचा ठोका चुकला! पण सत्य ऐकून सगळेच चकित

Tags

follow us