Download App

Manoj Jarange : मला अटक करुनच दाखवा, मनोज जरांगेंचं सरकारला ओपन चॅलेंज

Image Credit: Letsupp

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणावरुन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक होताना दिसत आहेत. सरकारने जर मला जेलमध्ये टाकून दाखवावं असं खुलं आव्हान मनोज जरांगे पाटील यांनी दिलं आहे. मला जर जेलमध्ये टाकलं तर मी जेलमध्येही आंदोलन करील असा सरकारला (State Govt)थेट इशारा दिला आहे. माझ्यावर सरकारने एसआयटी(SIT) नेमली आहे. मला एसआयटी कसली असते ती पाहायची आहे. मी आंतरवालीत तीची वाट पाहात आहे. पण ती काय माझ्याकडं आलीच नाही आणि अजूनही येईना. मला अटक करायला हिंमत लागते कारण माझ्याकडे एसआयटीत सापडण्यसारखं काहीच नाही, असेही यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले. पारनेरमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित सभेत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील बोलत होते.

अमरावतीत भाजपाचाच उमेदवार; राणा-अडसूळ वादाला बावनकुळेंची हवा

यावेळी मनोज जरांगे म्हणाले की, आपलं पोरगं मोठं करायचं असेल तर मराठ्यांना आरक्षणाशिवाय (Maratha Reservation आरक्षणात असलेली ताकद अगोदर समजून घ्या. आजपर्यंत महाराष्ट्रात 63 लाख नोंदी सापडल्या आहेत. या देशात सर्वात आधी मराठा समाजाला आरक्षण होतं. कारण 100 वर्षांपूर्वीच्या नोंदी सापडल्या आहेत. कारण बाकीच्यांना आरक्षण 1967 नंतर मिळालं आहे.

बाबा सिद्दीकीच्या एका शब्दावर अख्खं बॉलिवूड हजर होतं? 2024 मध्ये इफ्तारीत होणार ‘या’ खास गोष्टी

मराठा समाजाच्या 100 ते 200 वर्षांपूर्वीच्या नोंदी सापडायला लागल्या आहेत. याचा अर्थ पूर्वीपासून मराठा समाज हा ओबीसी आरक्षणात आहे. काहीजण म्हणातात की, आमच्या ओबीसी आरक्षणात घुसू नका, त्यामुळे मराठा बांधवांनो तेच आपल्या आरक्षणात घुसले आहेत. त्या सगळ्यात अगोदरपासून आपणच ओबीसी आरक्षणात आहोत. 75 वर्षात जेवढे पक्ष मोठे झाले या पक्षातले सगळे नेते मोठे करण्याचे काम आपल्या बापजाद्या मराठ्यांनी केले. आज त्यातला एकही नेता मराठा आरक्षणाच्या बाजूने बोलत नाही. ओबीसी आरक्षणाच्या बाजूने बोलत नाही.

आज मराठा आंदोलन शेवटच्या टप्प्यात आहे. आणि हे आपल्या बाजूने न बोलता नेत्यांच्या बाजूने बोलायला लागले आहेत. विरोधी पक्षासह सत्ताधाऱ्यांनी मला शत्रू मानलं आहे. माझ्या समाजाला दैवत मानलं ही माझी चूक आहे का? मी तुम्हाला मॅनेज होत नाही म्हणून तुमचा शत्रू आहे का? असा सवाल यावेळी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला. सकल मराठा समाज पारनेरच्या वतीने आयोजित मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा झाली.

मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण दिल्यामुळं मराठा समाज खुश आहे, असं सांगितलं जात आहे. तुम्ही 10 टक्के आरक्षण मिळाल्याने खुश आहेत का? असा सवाल यावेळी जरांगे पाटील यांनी विचारला त्यावर उपस्थितांनी नाही असे सांगितले. त्यावर जरागे पाटील म्हणाले की, तुम्ही खुश नाहीत मग त्या 10 टक्के आरक्षणाने कोण खुश आहेत? तुमच्याबरोबर जे चार पाच जण फिरतात ते खुश आहेत म्हणजे मराठा समाज खुश आहे, असं समजता का? असा सवालही उपस्थित केला.

follow us

वेब स्टोरीज