Download App

Ram Shinde : ‘मी लढणार, 2024 ला दाखवूनच देणार’; शिंदेंचा पवारांविरुद्धचा प्लॅन ठरला!

Ahmednagar Politics : कर्जत एमआयडीसीच्या मुद्द्यावर भाजप आमदार राम शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यात सुरू झालेला वाद आता 2024 मधील निवडणुकांवर येऊन ठेपला आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघात मागील निवडणुकीत मिळालेल्या पराभवाची सल राम शिंदे यांच्या मनात कायम आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत आमदार पवार यांचा पराभव करून हिशोब चुकता करण्याचा प्लॅन शिंदेंनी आखला आहे. राजधानी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना 2024 च्या निवडणुकीत कर्जत-जामखेड मतदाारसंघात काय घडामोडी घडतील याचे संकेतच शिंदेंनी दिले.

‘तुम्ही जामखेडच्या एमआयडीसीसाठी काय केलं?’ जुना इतिहास बाहेर काढत शिंदेंचा रोहित पवारांवर घणाघात

2024 मध्ये कर्जत जामखेड निवडणूक लढणार आहे. पक्षाच्यावतीने लढणार आहे. तुटलेला राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष आहे तो आमच्या विरोधात आहे. त्यांनी सदैव अशीच विरोधात राहण्याची भूमिका घ्यावी. म्हणजे कर्जत जामखेडला काय होणार आहे हे मी तुम्हाला 2024 ला दाखवून देईन, असे आव्हान त्यांनी आमदार पवार यांना दिले.

तुम्ही विरोधातच राहा,  2024 ला दाखवूनच देतो 

मतदारसंघातील ग्रामपंचायती जिंकल्या. ज्या होत्या त्याही घेतल्या. मार्केट कमिट्याही जिंकल्या. आता 2024 कडे जात असताना काय होणार याची जाणीव त्यांना (रोहित पवार) झाली आहे. आता माझ्या शेजारी त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचेच अध्यक्षच उभे आहेत. जिल्हा बँकेचे संचालक आहेत. तसेच बाजार समितीचे सभापतीही आहे. त्यामुळे आगामी काळात कर्जत जामखेडमध्ये काय होणार याची थोडी चुणूक तुम्हाला दाखवली. तुम्ही कर्जत-जामखेड मतदारसंघाचा अभ्यास केला तर तुमच्याही सारेकाही लक्षात येईल असे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना उद्देशून शिंदे म्हणाले.

पटेलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर रोहित पवारांना वेगळाच संशय; म्हणाले, हा तर देवेंद्र फडणवीसांना…

‘तुझ्याकडे बघतो’, हा कोणता संसदीय शब्द ?

राम शिंदेंनी काल सांगितलं होतं की मला दोन धमक्या आल्या आहेत. त्यावर आम्ही लोकशाही मार्गाने सरकारला जाब विचारू त्यांना पत्र लिहू असे रोहित पवार म्हणाले होते. यावर उत्तर देताना शिंदे म्हणाले, लोकशाही मार्गाने धमकी देणे म्हणजे तुझ्याकडे बघतो असे नसते. हा कोणता संसदीय शब्द आहे. माझ्याकडं तर बघतोच बघतो म्हटले पण सरकारकडही बघतो म्हणाले. अशा असंसदीय शब्दरचना वापरून लोकांची दिशाभूल करता येणार नाही. तुम्हाला ज्या लोकांनी निवडून दिलं आहे त्या लोकांच्या विश्वासाप्रती उत्तरदायी ठरलं पाहिजे पण, हे ज्यावेळी होत नाही त्यावेळी त्यांनी माझ्यावर आरोप करण्याचे काम सुरू केले आहे.

Tags

follow us