‘तुम्ही जामखेडच्या एमआयडीसीसाठी काय केलं?’ जुना इतिहास बाहेर काढत शिंदेंचा रोहित पवारांवर घणाघात
Ram Shinde criticized Rohit Pawar : कर्जत-जामखेड मतदारसंघातील एमआयडीसीचा वाद आता चांगलाच पेटला आहे. हा वाद आमदार रोहित पवार यांनी थेट विधीमंडळात नेला. तेथे भर पावसात आंदोलनही केलं. तरी देखील सरकारकडून काही ठोस आश्वासन मिळालं नाही. यानंतर कार्यकर्ते आक्रमक झाले त्यांनी कर्जतमध्ये ठिकठिकाणी रास्तरोको आंदोलन केलं. यानंतर आता भाजप आमदार राम शिंदे देखील आक्रमक झाले असून त्यांनी आ. पवार यांच्यावर जोरदार पलटवार केला.
विधीमंडळाच्या आवारात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी कर्जत एमआयडीसी आणि आगामी निवडणुकांचा मुद्दा उपस्थित रोहित पवार यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले.
राष्ट्रवादीचं घड्याळ गेलं तर पुढं काय? आयोगाच्या नोटीसनंतर रोहित पवार स्पष्टच बोलले
मनामध्ये शंका आहे. आंदोलन केलं. पण, आंदोलन करण्याची वेळ का आली? याआधी तुमचंच सरकार होतं त्यावेळी काय केलं? अडीच वर्षांच्या तुमच्या सरकारच्या काळात कर्जतमध्ये एमआयडीसी आणू शकले नाहीत. सात वर्षांपू्र्वी काम सुरू झालं. त्यानंतर 37 वर्ष जामखेडची एमआयडीसी निर्मिती झाली आहे. अशा स्थितीत ती एमआयडीसी का कार्यान्वित झाली नाही? त्या एमआयडीसीत उद्योग आले नाहीत? असे सवाल त्यांनी रोहित पवार यांना विचारले.
कर्जत आणि जामखेड हे एकाच मतदारसंघाचे भाग आहेत. त्यांना सगळ्याच पातळ्यांवर अपयश आलं आहे आणि हे अपयश झाकण्यासाठी माझ्यावर, मंत्र्यावर, सरकारवर आरोप करण्याचा त्यांनी जो घाट घातला आहे त्याला आता जनतेनं ओळखलं आहे. आता ते एकेरी भाषा वापरायला लागले आहेत जेव्हा केव्हा व्यक्ती असा वागतो, असं बोलतो त्यावेळी त्याच्या पायाखालची वाळू सरकल्याचे दिसते असे शिंदे म्हणाले.
MIDC : रोहित पवारांचा दबाव, राम शिंदेंचा आग्रह… पण उदय सामंत शेवटपर्यंत बधलेच नाहीत!
मी अजितदादांना जास्त भेटतो
माझं सरकार आहे. मी सरकारमधला सत्ताधारी आमदार आहे. त्यांचं सरकार होतं त्यावेळी ते काय विरोधी पक्षात बसत होते का? आता त्यांचा अर्धा पक्ष आमच्या सरकारमध्ये तर अर्धा पक्ष विरोधात आहे. निधी मागायचा म्हटलं तर 210 कोटी रुपये निधी आम्हाला दिला असं डबल बोलून चालत नाही. एकदा सरकारच्या बाजूने एकदा सरकारच्या विरोधात असं चालत नाही. मी सत्तापक्षाचा आमदार आहे. सगळ्या पक्षांकडं जातो. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे जातो. मुख्यमंत्र्यांकडं जातो. विशेष करून अजित पवार यांच्याकडं जास्त जातो.