Download App

Ahmednagar Politics : विखेंचं ‘पॉवर’ पॉलिटिक्स! थोरातांचा ‘तो’ निर्णय झटक्यात फिरवला

Ahmednagar Politics : राज्याच्या राजकारणात नगर जिल्ह्याचा चांगलाच दबदबा आहे. साखरसम्राटांचाही जिल्हा म्हणून नगरचं नाव आहे. सरकार कोणाचंही असो मंत्रीपदात नगर जिल्ह्याला झुकतं माप मिळतंच.  इथलं थोरात-विखे यांचं राजकीय वैर राज्याला चांगलंच माहित आहे. एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी हे दोन्ही नेते आजिबात सोडत नाहीत. आताही असाच एक प्रकार घडला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी घेतलेला एक निर्णय विद्यमान मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी झटक्यात फिरवला आहे. त्यांच्या या राजकीय खेळीची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. आ. थोरात (Balasaheb Thorat) महसूलमंत्री असताना त्यांनी आपले राजकीय वजन वापरून संगमनेर पोलीस ठाण्याला सात गावे जोडली होती. आता मंत्री विखे पाटील यांच्या पुढाकाराने ही गावे पुन्हा शिर्डी विधानसभा मतदारसंघातील आश्वी पोलीस ठाण्याला जोडली आहेत.

Lok Sabha Election : शरद पवारांचे शिलेदार करणार विखेंची कोंडी; नगरसाठी राष्ट्रवादीचा मोठ्ठा ‘डाव’

महाविकास आघाडी सरकारच्या काळात आ. थोरात यांनी कनकापूर, कनोली, हंगेवाडी, ओझर ब्रद्रुक, ओझर खुर्द, रहिमपूर, मनोली ही सात गावे संगमनेर पोलीस ठाण्याला जोडली होती. हा निर्णय घेण्यासाठी थोरात यांनी त्यांचं राजकीय वजन वापरलं अशीही चर्चा त्यावेळी झाली होती. या निर्णयामुळे संबंधित गावांतील नागरिकही खूश नव्हते. कारण, या गावांपासून संगमनेर साधारण वीस किलोमीटर अंतरावर पडत होते. त्यामुळे या गावातील ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेत त्यांना निवेदनही दिले होते. ग्रामपंचायतींमधील ठरावही सादर केले होते. मात्र, त्याचा काहीच उपयोग झाला नाही.

फडणवीसांचा ग्रीन सिग्नल, विखेंकडून हिशोब ‘क्लिअर’

त्यानंतर मात्र सत्ताबदल झाला. राज्यात महायुतीचं सरकार आलं. स्वतः राधाकृष्ण विखे पाटील नगर जिल्ह्याचे पालकमंत्री झाले. मग काय त्यांनी या प्रकरणात लक्ष घातलं. या निर्णयासाठी त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला. येथील वस्तुस्थिती काय आहे, ग्रामस्थांच्या भावना काय आहेत याची माहिती फडणवीसांना दिली. त्यानंतर फडणवीसांनीही या निर्णयाला ग्रीन सिग्नल दिला. अशा पद्धतीने हा निर्णय प्रत्यक्षात आला. या निर्णयामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर बाळासाहेब थोरात यांना धक्का बसल्याचे मानले जात आहे. विखे यांनीही आपलं राजकीय वजन वापरत निर्णयात बदल करून राजकीय हिशोब क्लिअर केल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

Ahmednagar News : मराठवाड्याला पाणी सोडण्यापूर्वी प्रशासनाकडून ‘या’ भागांमध्ये जमावबंदी..

Tags

follow us