Ahmednagar : विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणारे शिक्षक यांना विद्यार्थी आपले गुरूच मानतात. मात्र या पवित्र नात्याला काळिमा फसण्याची अत्यंत धक्कादायक घटना अहमदनगर (Ahmednagar) शहरातील एका प्रतिष्ठीत महाविद्यालयात घडली आहे. परीक्षेमध्ये चांगले गुण देतो. मात्र त्याबदल्यात विद्यार्थिनींकडे शरीर सुखाची मागणी एका प्राध्यापकाने केली आहे. या प्रकरणी या प्राध्यापकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या प्रकाराने पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
‘सर्जनशीलतेच्या नावाखाली…’ : अश्लील सीन्सवरुन मंत्री अनुराग ठाकूर यांनी ‘ओटीटी’ प्लॅटफॉर्मला फटकारले
याबाबत अधिक माहिती अशी, नगर शहरातील या महाविद्यालयात पीडित विद्यार्थिनी शिक्षण घेत आहे. सध्या बारावीच्या कला शाखेत शिक्षण घेत असलेल्या या विद्यार्थिनीने आपल्या फिर्यादीत म्हंटले आहे कि, ५ फेब्रुवारीला या प्राध्यापकाने यांनी मला त्यांच्या कॅबिनमध्ये बोलावून घेतले. तुला भूगोलाच्या प्रात्यक्षिक परिक्षेत 20 पैकी 20 गुण हवे असतील तर मी देतो. परंतु त्याच्या बदलामध्ये तू मला काय देशील? असे हा प्राध्यापक म्हणाला. संबंधित विद्यार्थिनीने या विषयावर भाष्य करणे टाळत त्याठिकाणाहून निघून गेले. त्यानंतर पुन्हा एकदा संबंधित प्राध्यापकाने कॉलजेच्या परिसरात पुन्हा आपल्याकडे अशीच मागणी केली. तेव्हाही मी या गोष्टीकडे दुर्लक्ष केले.
Udhhav Thackeray : राज्याला एक मनोरुग्ण गृहमंत्री लाभलाय, ठाकरेंचे फडणवीसांवर ताशेरे
मात्र आपण त्या प्राध्यापकाला टाळत असल्याने शेवटी मला प्रात्यक्षिक परीक्षेत त्यांनी शून्य गुण दिले. त्यामुळे 8 फेब्रुवारीला मी त्यांना त्यासंबंधी विचारण्यासाठी गेले. तेव्हा त्यांनी अश्लील हावभाव करीत पुन्हा तशीच मागणी केली. माझे लैंगिक शोषण करण्याचा त्यांचा हेतू असल्याचे मला जाणवले. त्यामुळे मी तेथून निघून गेले. बदनामीच्या भीतीने याबाबाबत मी कोणाशीही चर्चा केली नाही. दुसऱ्या दिवशी मी आई-वडिलांना हा प्रकार सांगितला. त्यांनी धीर दिला आणि आम्ही पोलिस ठाण्यात येऊन फिर्याद दिली. असे फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान याबाबत पीडित विद्यार्थिनीने नगरच्या तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात सतीश शिर्के यांच्याविरूद्ध विनयभंग तसेच बालकांचे लैंगिक शोषण प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे.