Ahmednagar News : नगर-मनमाड रोडवरील इमारतीला आग; फायनान्स कंपनीचे मोठे नुकसान
Ahmednagar News : अहमदनगर शहरात (Ahmednagar News) एका इमारतीला भीषण आग (fire) लागल्याची घटना घडली. नगर-मनमाड रोडवरील साई मिडास या इमारतीतील वरच्या मजल्यावरील एका फायनान्स कंपनीच्या कार्यालयाला सकाळी साडेनऊच्या सुमारास आग लागल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आल्याने ही घटना समोर आली.
महाराष्ट्रात ओबीसींच्या नव्या पक्षाची स्थापना होणार; प्रकाश शेंडगेंची मोठी घोषणा
या इमारतीमध्ये बँका, पतसंस्था, सोन्या-चांदीचे दुकाने, दवाखाना तसेच फायनान्स कंपनीची कार्यालये आहेत या इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावर एका फायनान्स कंपनीचे कार्यालय आहे. या कार्यालयाच्या शेजारीच एक डोळ्यांचा दवाखाना ही आहे. ही आग लागल्याचे कळताच काही क्षणातच ही आग भडकली आणि आगीसोबत मोठ्या प्रमाणावर धूर बाहेर पडू लागला.
Pune News : धक्कादायक! तहसील कार्यालयातूनच ‘ईव्हीम’ कंट्रोल युनिट चोरले; गुन्हा दाखल
ही बाब स्थानिकांनी महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला कळवली. अग्निशमन विभागाने तत्काळ बंब दाखल झाला आणि पाण्याच्या फवाऱ्याने ही आग विझवण्यात यश आले. यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. मात्र इमारतीवरील काही फर्निचरचा भाग खाली कोसळला. शहरातील हा अत्यंत वर्दळीचा भाग आहे. या भागात अनेक हॉटेल, हॉस्पिटल्स आणि कार्यालये आहेत. त्यामुळे नागरिकांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते.
गेल्या काही दिवसांपूर्वी शहरातील सावेडी उपनगरात असलेल्या पारिजात चौकात असलेल्या दुकानांना सुमारास अचानक आग लागली होती. दुकानांच्या जवळ असलेल्या जागेत कचरा पेटवल्यामुळे आग लागली असावी, असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे होते. कचरा पेटवल्यानंतर वाऱ्यामुळे जळत असलेला कचरा दुकानांजवळ येऊन दुकानांना आग लागली, असे सांगण्यात आले होते. दुकाने एकमेकांना लागूनच असल्याने या भीषण आगीत अनेक दुकाने आगीच्या विळख्यात सापडली होती. त्यानंतर आता पुन्हा शहरात आगीची घटना घडली आहे.