Ram Shinde : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) या 26 ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील शिर्डी (Shirdi)येथे येणार आहे. दरम्यान देशातील मोठ-मोठे नेतेमंडळी यांचे दौरे हे नेहमी उत्तरेकडेच, मोठे कार्यक्रम हे देखील उत्तरेकडेच झाले, देशाचे राष्ट्रपती (President Of India)आले तेदेखील उत्तरेकडेच, उत्तर हा जिल्ह्याचाच एक भाग आहे मात्र सगळे नेतेमंडळींचा दौरा उत्तरेकडेच यावरून आमदार राम शिंदे (Ram Shinde)यांनी प्रश्न उपस्थित करत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil)यांना टोला लगावला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 26 ऑक्टोबर रोजी शिर्डी दौरा नियोजित आहे. यावेळी विविध विकासकामांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. दरम्यान या संदर्भातच आज नामदार विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कोहिनूर मंगल कार्यालय येथे भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली यावेळी आमदार राम शिंदे यांच्यासह भाजपचे नेते मंडळी उपस्थित होते.
ड्रग्ज प्रकरणात संबंध आढळला तर राजकारण सोडेन, खोटारडे आरोप खपवून घेणार नाही; दादा भुसेंचा इशारा
भाजप आमदार राम शिंदे यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच मोठमोठे नेते हे नेहमी नगर जिल्हा दौऱ्यावर आले असता ते उत्तरेकडेच आले. आजवर मोठ मोठे कार्यक्रम पार पडले ते देखील उत्तरेकडेच,शासनाचा बहुचर्चित असा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम देखील उत्तर भागातच पार पडला.
आता राहिले साहिले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत, ते देखील शिर्डी येथेच म्हणजेच उत्तरेकडेच. उत्तर हा देखील जिल्ह्यातच भाग आहे,सगळे नेते मंडळी हे नेहमी उत्तरेकडेच असा हसतमुख सवाल भाषणावेळी आमदार राम शिंदे यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना केला.
तसेच तुमचं भाषण आधीच झालं आहे, त्यामुळे आता माझ्या भाषणानंतर तुम्हाला बोलण्याची संधी नाही. त्यामुळे या सभेत तर तुम्ही उत्तर देऊ शकत नाही. त्यामुळे कोहिनूर मंगल कार्यालय येथे केवळ नियोजनाच्या बैठका होतात, मग त्यानंतर इथून सर्व कार्यकर्त्यांना घेऊन आम्हाला उत्तरेकडे जावे लागते,असा खोचक टोला यावेळी शिंदे यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना लगावला. त्यामुळे आमच्या दक्षिणेकडील लोकांचे मोठे हाल होत आहेत. कधीतरी असे राजकीय कार्यक्रम दक्षिणेकडील सिद्धटेकला घ्यावे, अशी मागणी यावेळी आमदार राम शिंदे यांनी केली.