ड्रग्ज प्रकरणात संबंध आढळला तर राजकारण सोडेन, खोटारडे आरोप खपवून घेणार नाही; दादा भुसेंचा इशारा

ड्रग्ज प्रकरणात संबंध आढळला तर राजकारण सोडेन, खोटारडे आरोप खपवून घेणार नाही; दादा भुसेंचा इशारा

Dada Bhuse On Sushma Andhare : ललित ड्रग्ज प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अधारे (Sushma Andhare)यांनी मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी मंत्री दादा भुसे यांची नार्को टेस्ट (Narco test)करा, अशी मागणी देखील सुषमा अंधारे यांनी केली आहे. त्यावर मंत्री दादा भुसे यांनी ड्रग्ज प्रकरणामध्ये आपला काही संबंध आढळला तर राजकारण (Politics)सोडून देईल, अशा प्रकारचे खोटारडे आरोप खपवून घेतले जाणार नाहीत,असा इशाराही यावेळी मंत्री दादा भुसे यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना दिला आहे. मंत्री दादा भुसे यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

आयकॉनिक काऊच ते कॉफी मग; करण जोहरने दाखवली ‘Koffee With Karan 8’ची पहिली झलक

मंत्री दादा भुसे म्हणाले की, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी यापूर्वीही ड्रग्ज प्रकरणी चौकशीची मागणी केली होती, त्यावर आपण चौकशीसाठी तयार असल्याचे सांगितले. त्यावर त्यांचे समाधान झाले. पण आता परत त्यांची काही चौकशीची मागणी असेल त्यासाठी आपली तयारी असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

ललित पाटील प्रकरणात बोलणाऱ्या अनेकांची तोंड बंद होणार; फडणवीसांचा इशारा

सुषमा अंधारे यांनी मंत्री दादा भुसे आणि मंत्री शंभुराज देसाई यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यावर दादा भुसे म्हणाले की, आपण कोणत्याही चौकशीसाठी तयार आहोत. असल्या आरोपांना मी भीक घालत नाही. त्याही दिवशी आपण सांगितलं की, आपलं उत्तरदायित्व जनतेशी आहे, महाराष्ट्राशी आहे, देवाशी आहे.

ललित पाटीलने माध्यमांशी बोलताना सांगितले की, मी ससून रुग्णालयातून पळून गेलो नाही तर मला पळवलं आहे. त्यावर मंत्री दादा भुसे म्हणाले की, चौकशीमध्ये या सर्व गोष्टी समोर येतील. ड्रग्ज प्रकरणामध्ये आपला काही संबंध दिसून आला तर आपण पद तर सोडाच हे संपूर्ण राजकारण सोडून देण्याची तयारी असल्याचे यावेळी मंत्री दादा भुसे यांनी सांगितले.

त्याचबरोबर सुषमा अंधारे यांनी केलेल्या आरोपांवरुनही मंत्री भुसे यांनीही गंभीर आरोप केला आहे. सुषमा अंधारे यांच्या पाठिमागे बोलवता धनी कोणी आहे का? असाही प्रश्न दादा भुसे यांनी उपस्थित केला आहे. त्याचवेळी मंत्री भुसे म्हणाले की, जे कोणी माझ्या नार्को टेस्टची मागणी करत असेल त्याचीही नार्को टेस्ट करावी. माझी नार्को टेस्ट करावी त्यानंतर माझ्यावर आरोप करणाऱ्यांचीही नार्को टेस्ट करावी.

सुषमा अंधारे या अंतरराष्ट्रीय पातळीवरच्या नेत्या आहेत. त्या महिला आहेत म्हणून आम्ही त्यांचा सन्मान करतो. परंतु त्यांनी वारंवार उचलायची जीभ आणि लावायची टाळूला, पहिल्याच आरोपांमध्ये मी त्यांना सांगितलं होतं की, तुम्ही सांगाल त्या चौकशीला मी सामोरं जायला तयार आहे, पण वारंवार त्यांना प्रसिद्धीमध्ये राहण्याची हौस असेल म्हणून त्या वारंवार आरोप करत आहेत. अशा प्रकारचे खोटारडे आरोप कोणी करत असेल तर खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही यावेळी मंत्री दादा भुसे यांनी दिला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube