Ajit Pawar : महाराष्ट्र ही भक्ती आणि शक्तीची भूमी आहे. शिर्डीच्या (Shirdi)साईबाबांनी (Saibaba)सर्व समुदयासाठी एक मंत्र दिला, सबका मालिक एक. अर्थात सर्व जगाचा कल्याण करणारा इश्वर एकच आहे. पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi)देखील 2014 मध्ये पहिल्यांदा पंतप्रधानपद स्विकारल्यानंतर सबका साथ सबका विकास, या घोषणेप्रमाणेच गेल्या साडेनऊ ते दहा वर्षात देशाला पुढे नेत आहेत, असेही यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांनी सांगितले. शिर्डीमध्ये (Shirdi)आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
‘बाबा महाराज सातारकर देशाचे अनमोल रत्न होते’ : भाषणाच्या सुरुवातीलाच PM मोदींकडून आदरांजली
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महारष्ट्राच्या दौऱ्यावर आले. शिर्डी येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल रमेश बैस, अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे, कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह अनेक आमदार खासदार उपस्थित होते.
‘बाबा महाराज सातारकर देशाचे अनमोल रत्न होते’ : भाषणाच्या सुरुवातीलाच PM मोदींकडून आदरांजली
अजितदादा म्हणाले की, पंतप्रधान मोदी म्हणजेच विकास हे समिकरण अगदी घट्ट झालं आहे. त्यामुळे विकास हा समान धागा असल्याने आम्ही सर्वजण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहोत. आज अनेक महत्वाच्या प्रकल्पांचं भूमिपूजन आणि उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते आहे.
त्याच्यामध्ये बळीराजाचा महत्वाचा प्रश्न म्हणजे पाण्याचा. मला आठवतं माझं आजोळ नगर जिल्हा असल्यामुळे 53 वर्ष कितीतरी वेळा निळवंडे धरणाचा नारळ फोडण्याचं काम अनेक राज्यकर्त्यांनी केलं.
निवडणुका आल्या की नारळ फोडायचा, लोकांना सांगायचं की, आम्ही निळवंडे करणार, बघता बघता तीन पिढ्या यामध्ये गेल्या. साडेआठ टीएमसी क्षमतेचं धरण, पावणेदोन लाख एकर क्षेत्र ओलिताखाली आणणारं हे धरण असल्याचं यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
शिर्डीच्या साई मंदिरातून भाविकांना आंतरिक ऊर्जा मिळत असते. पीएम नरेंद्र मोदींच्या दौऱ्यातून लोककल्याणाच्या कार्य होत आहे. साईमंदिर परिसरात वेगवगेळे प्रकल्प सुरु करण्यात आले.
यामुळे भाविकांची चांगली सोय होणार आहे. अनेक वर्षांपासून रखडलेला निळवंडे धरणाचा प्रकल्प पूर्णत्वास गेला.
आज पीएम नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डाव्या कालव्याचे उद्घाटन करण्यात आले. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. पावणेदोन लाख क्षेत्र हेक्टर जमीन ओलिताखाली येणार असल्याचेही यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.