Shirdi Lok Sabha Election Results 2024 : शिर्डी लोकसभा मतदारसंघातील तिरंगी लढतीचे निकाल येण्यास सुरुवात झाली आहे. शिर्डीतही अटीतटीची लढत दिसून येत आहे. आतापर्यंतच्या मतमोजणीत ठाकरे गटाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरेंनी आघाडी घेतली आहे. नगर व शिर्डी लोकसभा मतदार संघाची निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया सुरु असून यामध्ये निवडणूक आयोगानुसार ठाकरे गटाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांना 89 हजार 756 मते मिळाली तर महायुतीचे उमेदवार 82 हजार 612 मते मिळाली. तसेच वंचित बहुजन आघाडीच्या उत्कर्षा रुपवते यांना 21 हजार 151 मते मिळाली आहेत.
Ahmednagar Loksabha चा गड कोण राखणार, विखे की लंके? काय सांगतो एक्झिट पोलचा अंदाज?
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात १३ मे रोजी शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी मतदान झालं. यावेळी मतदारसंघात चांगलं मतदान झालं होतं. यानंतर आज सकाळपासुन मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीच्या टप्प्यात चित्र स्पष्ट होत नव्हतं. आधी पोस्टल मतदानाची मोजणी झाली. यानंतर मतदान यंत्रातील मतमोजणीला सुरुवात झाली.
आज सकाळपासूनच मतमोजणीला सुरुवात झाली आहे. शिर्डी मतदारसंघातील मतमोजणी सुरू असून निकाल हाती येत आहेत. आतापर्यंतच्या मतमोजणीत भाऊसाहेब वाकचौरेंनी आघाडी घेतली आहे. तर शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे मागे पडले आहेत. वंचित आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांनीही चांगली मते घेतली आहेत. त्यामुळे येथील क्षणाक्षणाला अटीतटीची होत चालली आहे.