अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर आमदार तांबेंबाबत काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली ‘ही’ मागणी

Ahmednagar : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला (congress)रामराम ठोकत पक्षातून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. यातच काँग्रेसचे आमदार सत्यजित तांबे (Satyajit Tambe )यांच्याबाबत आता काँग्रेस कार्यकर्त्यांनी एक महत्वाची मागणी सोशल मीडियावर (Social media)केली आहे. तांबे यांचं निलंबन रद्द करुन काँग्रेसने त्यांना सन्मानपूर्वक पुन्हा पक्षात घ्यावं, अशी […]

Satyajit Kadam

Satyajit Kadam

Ahmednagar : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला (congress)रामराम ठोकत पक्षातून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. यातच काँग्रेसचे आमदार सत्यजित तांबे (Satyajit Tambe )यांच्याबाबत आता काँग्रेस कार्यकर्त्यांनी एक महत्वाची मागणी सोशल मीडियावर (Social media)केली आहे. तांबे यांचं निलंबन रद्द करुन काँग्रेसने त्यांना सन्मानपूर्वक पुन्हा पक्षात घ्यावं, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून होत आहे.

‘TMC चे गुंड महिलांचे अपहरण करुन बलात्कार करायचे’; केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा हल्लाबोल

महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकापेक्षा एक बडे नेते पक्षाला सोडचिठ्ठी देत सत्ताधाऱ्यांच्या वळचळणीला जात असताना काँग्रेस कार्यकर्त्यांनी मात्र सोशल मीडियावर एक वेगळीच मागणी केली आहे.

फारूख अब्दुल्लांच्या अडचणीत वाढ, २० वर्ष जुन्या प्रकरणात ईडीने पाठवले समन्स

नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक अपक्ष म्हणून लढवणाऱ्या आमदार सत्यजीत तांबे यांचं निलंबन रद्द करून काँग्रेसने त्यांना सन्मानपूर्वक पुन्हा पक्षात घ्यावं, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून होत आहे.

हा नेता अजूनही भाजपमध्ये गेला नाही, हे लक्षात घ्या, असं म्हणत सत्यजीत तांबे यांच्यासारख्या युवा आणि काँग्रेसशी वर्षानुवर्षे एकनिष्ठ राहिलेल्या नेत्याला संधी द्यावी,, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan)यांनी आपल्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा (resignation)दिला आहे. ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्याकडे आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे..

Exit mobile version