फारूख अब्दुल्लांच्या अडचणीत वाढ, २० वर्ष जुन्या प्रकरणात ईडीने पाठवले समन्स

  • Written By: Published:
फारूख अब्दुल्लांच्या अडचणीत वाढ, २० वर्ष जुन्या प्रकरणात ईडीने पाठवले समन्स

ED Summons Farooq Abdullah : जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला (Farooq Abdullah ) यांना ईडीने (ED) मनी लॉंड्रिंगशी संबंधित एका प्रकरणात समन्स बजावले आहेत. मंगळवारी सकाळी 11 वाजता ईडीने त्यांना चौकशीसाठी श्रीनगर कार्यालयात हजर राहण्यास सांगितलं आहे. ईडीने सांगितलं की, हे प्रकरण जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशन मनी लाँड्रिंगशी संबंधित आहे.

IND vs ENG : टीम इंडियाला मोठा झटका! के.एल राहुलच्या जागी ‘या’ खेळाडूला संधी! 

जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशन (JKCA) मध्ये सुमारे 113 कोटी रुपयांची आर्थिक अनियमिततेचा प्रकार उघडकीस आला होता. ही रक्कम संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आपापसात वाटून घेतल्याचा आरोप करण्यात आला. 2015 मध्ये जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाने क्रिकेट घोटाळ्याचा तपास सीबीआयकडे सोपवला होता. 11 जुलै 2018 रोजी सीबीआयच्या एफआयआरच्या आधारे ईडीनेही मनी लाँड्रिंगचा गुन्हा नोंदवला आणि तपास सुरू केला.

‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या शाळांसाठी इंद्राणी बालन फाऊंडेशनची तीन कोटींची मदत 

अब्दुल्ला यांच्यावर नेमका आरोप काय?

आरोपपत्रात म्हटले आहे की फारुख अब्दुल्ला यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात खेळाच्या विकासाच्या नावाखाली जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशनचे अधिकारी आणि इतरांकडून मिळालेला निधी इतरत्र वळवला. आणि त्या निधीची वापर वैयक्तीक फायद्यासाठी केला. हा निधी अनेक खाजगी बँक खात्यांमध्ये आणि जवळच्या नातेवाईकांना पाठवण्यात आळा. नंतर निधी आपापसात वाटून घेतला.

2018 मध्ये, ईडीने सीबीआयच्या आरोपपत्राच्या आधारे या प्रकरणात पीएमएलएची चौकशी सुरू केली. बीसीसीआयने असोसिएशनला 112 कोटी रुपये दिले होते. त्यातील 43.6 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. फारुख अब्दुल्ला जम्मू आणि काश्मीर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष असताना 2001 ते 2012 दरम्यान हा कथित घोटाळा झाला होता.

८६ वर्षीय फारुख अब्दुल्ला यांना गेल्या महिन्यात याच प्रकरणात तपास यंत्रणेने समन्स बजावले होते. त्यावेळी प्रकृतीचे कारण सांगून ते श्रीनगर येथील ईडी कार्यालयात हजर झाले नाहीत. मात्र, आता त्यांना पुन्हा एकदा समन्स पाठवले आहेत.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube