आता चर्चा नाही, तर पाकिस्तानशी अखेरची लढाई करावी ; फारुख अब्दुल्ला संतापले

आता चर्चा नाही, तर पाकिस्तानशी अखेरची लढाई करावी ; फारुख अब्दुल्ला संतापले

Farooq Abdullah : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याबाब (Pahalgam Terror Attack) जम्मू-कश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला (Farooq Abdullah) यांनी पाकिस्तानवर तीव्र टीका केली. पाकिस्तानने मानवतेची हत्या केली. आता चर्चा नाही, तर पाकिस्तानशी अखेरची लढाई करावी. भविष्यात अशी घटना घडू नये म्हणून आता भारताने बालाकोटपेक्षाही कठोर कारवाई करण्याची मागणी अब्दुल्ला केली आहे.

1 मे पासून होणार ‘हे’ 5 मोठे बदल, तुमच्या खिशावर कसा परिणाम होईल? 

फारुख अब्दुल्ला म्हणाले की, मला वाईट वाटते की, आपल्या शेजाऱ्याला अजूनही हे समजलेले नाही की त्यांनी मानवतेची हत्या केली आहे. यामुळं काश्मीर पाकिस्तानचा भाग होईल असं त्यांना वाटत असेल तर तो त्यांचा खूप मोठा गैरसमज आहे. आम्ही १९४७ मध्ये पाकिस्तानात गेलो नाही, मग आता जाऊ? भारताने १९४७ मध्येच द्विराष्ट्र सिद्धांत नाकारला होता आणि आजही तो स्वीकारण्यास तयार नाही, कारण देशात हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन हे सर्व एक आहेत, असं ते म्हणाले.

आता चर्चा नाहीच…
पाकिस्तानला वाटते की यामुळे आम्ही कमकुवत होऊ. यामुळं आपण कमकुवत करणार नाही, तर अधिक मजबूत होऊ. पाकिस्तान म्हणत आहे की चर्चा व्हायला हवी. आता काय चर्चा करणार? मी नेहमीच चर्चेला प्राधान्य द्यायचो, पण, अशा परिस्थितीत चर्चा होऊ शकत नाही.

पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांचा विचार करता केवळ बोलणी करणे हा न्याय ठरणार नाही. त्यांनी भारत सरकारकडून कठोर कारवाईची मागणी केली. आता चर्चा नाही, न्याय हवा आहे. आता भारताने बालाकोट सारखी नाही तर पाकिस्तानवर अशी कारवाई करावी, जेणेकरून अशा घटना पुन्हा घडू नयेत. आता सरकारने पाकिस्तानशी शेवटची लढाई लढावी आणि त्यांना जशात तसं उत्तर द्यावे, असं ते म्हणाले.

MHT-CET परिक्षेतील घोटाळ्याची चौकशी करा, पेपरमधील चुकांचे गुण विद्यार्थ्यांना द्या, हर्षवर्धन सपकाळांची मागणी 

पाकिस्तानवर आणखी निशाणा साधत, जेकेएनसी प्रमुखांनी भारताच्या एकतेवर भर दिला, द्विराष्ट्र सिद्धांत नाकारला आणि हिंदू, मुस्लिम, शीख आणि ख्रिश्चन हे सर्व एक आहेत असे प्रतिपादन केले.

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला काय उत्तर द्यायचे आहे, असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारला पाहिजे. तसेच पाकिस्तानविरुद्ध कठोर निर्णय घेण्यासोबतच केंद्र सरकारने या दहशतवादी हल्ल्याचा तपास एनआयएकडे सोपवला आहे, असंही अब्दुल्ला म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube