सात दिवस रेकी अन् 22 ला थेट फायरिंग; पहलगाम हल्ला प्रकरणी मोठा खुलासा

Pahalgam Terror Attack : मंगळवारी दुपारी पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांचं नाव आणि धर्म कोणता असं विचारून गोळ्या घातल्या. या भ्याड हल्ल्याचा देशभरातून निषेध करण्यात येत आहे. सहा त सात दहशतवाद्यांनी हत्याकांड घडवून आणल्याचं सांगितलं जात आहे. टीआरएफ कमांडर सैफुल्लाहने या हल्ल्याचा कट रचल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, आता या हल्ल्याबाबत मोठी माहिती हाती आली आहे. हल्ला करण्याआधी अतिरेक्यांनी या परिसराची रेकी केली होती.
जम्मू काश्मीरातील पहलगाम येथे काल (Pahalgam Terror Attack) दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या भ्याड हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. हल्ल्यात या अतिरेक्यांनी हिंदू धर्मियांना टार्गेट केलं. त्यांची धार्मिक ओळख आणि नावं विचारून (Jammu Kashmir Attack) त्यांना गोळ्या घातल्या. भारताचं स्वित्झर्लंड म्हणून ओळखलं जाणारं पहलगाम रक्तरंजित झालं. या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींवर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मयतांत दोन विदेशी आणि दोन स्थानिक नागरिकांचाही समावेश आहे.
मोठी बातमी! एलओसीजवळील घुसखोरीचा डाव उधळला; चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा
टीआरएफने घेतली हल्ल्याची जबाबदारी
या हल्ल्यात जवळपास वीस लोक जखमी झाले आहेत. सुरक्षा यंत्रणांनी काही संशयितांना रात्रीच ताब्यात घेतलं आहे. या हल्ल्याची जबाबदारी द रेजिस्टेंस फ्रंटने घेतली आहे. फेब्रुवारी 2019 मध्ये पुलवामात झालेल्या हल्ल्यानंतरचा हा दुसरा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. भारतीय सेना, जम्मू काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफने हल्लेखोर दहशतवाद्यांचा शोध सुरू केला आहे. महामार्गांवरील सर्व वाहनांची तपासणी केली जात आहे. हेलिकॉप्टरच्या मदतीनेही जंगलात या दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे.
एनआयए करणार तपास
जम्मू काश्मीरात नागरिकांवर (Jammu Kashmir) झालेला हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. डोडा आणि किश्तवाड सक्रिय राहिलेल्या टीआरएफ या दहशतवादी संघटनेने हे नृशंस हत्याकांड घडवून आणलं आहे. या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा, गुप्तचर यंत्रणा, तपास यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत. या हल्ल्याचा तपास एनआयए करणार आहे.