मोठी बातमी! एलओसीजवळील घुसखोरीचा डाव उधळला; चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

Uri Encounter : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याची (Pahalgam Attack) घटना ताजी असतानाच आज जवानांनी अतिरेक्यांच्या घुसखोरीचा (Uri Encounter) डाव हाणून पाडला. या दरम्यान सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांत झालेल्या चकमकीत दोन अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला. ही घटना बारामुला जिल्ह्यातील उरी नाला परिसरात घडली.
J&K | Heavy exchange of fire between security forces and terrorists, two terrorists have been eliminated, infiltration bid foiled by the security forces in the ongoing Operation in Baramulla. Large quantity of weapons, ammunition and other war-like stores have been recovered from… pic.twitter.com/OS3opx8lLg
— ANI (@ANI) April 23, 2025
भारतीय सैन्याच्या माहितीनुसार आज बुधवारी दोन ते तीन दहशतवादी बारामुल्लातून भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. परंतु, या भागात भारतीय सैन्य सतर्क होते. त्यांनी लागलीच प्रत्युत्तरास सुरुवात केली. त्यांना प्रतिकार केला. त्यामुळे चिडलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबारास सुरुवात केली. याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय जवानांनीही गोळीबार केला. या गोळीबारात दोन अतिरेक्यांचा खात्मा झाला.
Pahalgam Terror Attack Live : महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू; संध्याकाळी मृतदेह पुण्यात आणणार
या चकमकीत ठार झालेल्या अतिरेक्यांकडे हत्यारे आणि युद्धाशी संबंधित अन्य वस्तूंचा मोठा साठा होता. हा सगळा साठा भारतीय सैन्याने ताब्यात घेतला आहे. या भागात आणखी काही दहशतवादी लपले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे सैन्याकडून सर्च ऑपरेशन राबवण्यात येत आहे. या चकमकीनंतर परिसरातील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.
पहलगाममध्ये 26 पर्यटकांचा मृत्यू
जम्मू काश्मीरातील पहलगाम येथे काल (Pahalgam Terror Attack) दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या भ्याड हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. हल्ल्यात या अतिरेक्यांनी हिंदू धर्मियांना टार्गेट केलं. त्यांची धार्मिक ओळख आणि नावं विचारून (Jammu Kashmir Attack) त्यांना गोळ्या घातल्या. भारताचं स्वित्झर्लंड म्हणून ओळखलं जाणारं पहलगाम रक्तरंजित झालं. या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींवर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दु्र्दैव! डोंबवलीच्या मावसभावंडांची काश्मीर सहल ठरली अखेरची; दहशतवादी हल्ल्यात मृत्यू