‘TMC चे गुंड महिलांचे अपहरण करुन बलात्कार करायचे’; केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा हल्लाबोल

‘TMC चे गुंड महिलांचे अपहरण करुन बलात्कार करायचे’; केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा हल्लाबोल

Smruti Irani : टीएमसीचे गुंड नागरिकांच्या घरात जाऊन कोणाची पत्नी सुंदर आहे हे बघत होते, असा गंभीर आरोप केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smruti Irani) यांनी केला आहे. इराणी यांनी संदेशखाली मुद्द्यावरुन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे.

लढाई खडतर, विरोधी पक्षच मोडीत निघाले तर..; चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर सुषमा अधारेंकडून चिंता व्यक्त

पुढे बोलताना इराणी म्हणाल्या, टीएमसीचे गुंड घरात जाऊन कोणाची पत्नी सुंदर आहे हे बघत होते. ज्या महिलेची निवड करायचे तिच्या पतीला सांगायचे की आता या महिलेवर आमचा अधिकार आहे, असा आरोप स्मृती इराणी यांनी केला आहे.

तसेच पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी सरकारची हिंदुंच्या नरसंहारासाठी ओळख आहे. त्यानंतर आता टीएमसीच्या गुंडांनी विवाहित महिलांवर बलात्कार केला असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. ममता सरकार हिंदुंच्या नरसंहारासाठी ओळखली जात असून आपल्या गुंडांना बलात्कार करण्यासाठी महिलांना निवडण्याची परवानगी देत होते. संदेशखाली महिलांवर सामूहिक बलात्कार करण्याचा आरोप असणारे लोकं कोण आहेत? आत्तारपर्यंत अनेकजण विचारतात की हे शेख शाहजहॉं कोन आहेत? असा सवालही स्मृती इराणी यांनी केला आहे.

पक्ष वाढवणाऱ्यांवर अशी वेळ म्हणजे दुर्दैव, काँग्रेसने गांभीर्याने विचार करण्याची गरज चव्हाणांच्या राजीनाम्यावर शिंदेची प्रतिक्रिया

संदेशखालीमध्ये टीएमसीचे गुंडे प्रत्येक रात्री महिलांचे अपहरण करीत होते. हे गुंड महिलांवर बलात्कार करीत होते. संदेशखाली येथील महिलांनी आपल्यावर घडलेल्या प्रकाराबाबत माध्यमांना सांगितलं आहे. या महिलांच्या दाव्यानूसार टीएमसीचे गुंड सुंदर दिसणाऱ्या महिलांच्या घरी चाचपणी करण्यासाठी येत असत. त्यानंतर त्या महिलेच्या पतीला सांगत की आता आमचा तुझ्या पत्नीवर अधिकार आहे. त्यानंतर त्या महिलेचं अपहरण करुन तिच्यावर बलात्कार करीत असत. राज्यातील दलित, मच्छिमार, आणि शेतकरी समाजातील महिलांनी हे आरोप केले असल्याचंही स्मृती इराणी यांनी स्पष्ट केलं आहे..

दरम्या, कथित बलात्कारांच्या घटनांप्रकरणी टीएमसीच्या नेत्यांना अटक करण्याची मागणी करत संदेशखाली परिसरातील नागरिकांनी आंदोलन केलं होतं. त्यानंतर या परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या

वेब स्टोरीज