लढाई खडतर, विरोधी पक्षच मोडीत निघाले तर..; चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर सुषमा अधारेंकडून चिंता व्यक्त

  • Written By: Published:
लढाई खडतर, विरोधी पक्षच मोडीत निघाले तर..; चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर सुषमा अधारेंकडून चिंता व्यक्त

Sushama Andhare : राज्यात काँग्रेसला (Congress) पुन्हा एक मोठा झटका बसला. काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीमान्यामुळं राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. चव्हाण आता भाजपच्या (BJP) वाटेवर असल्याची चर्चा रंगली आहे. त्यांना राज्यभेची उमेदवारी मिळेल, अशीही शक्यता वर्तवली जातेय. दरम्यान, या राजकीय घडामोडीनंतर आता ठाकरे गटाचा नेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांनी प्रतिक्रिया दिली.

चव्हाणांनी पक्ष सोडणं हे दुर्भाग्यपूर्णच; राजीनाम्यानंतर बाळासाहेब थोरातांची पहिली प्रतिक्रिया… 

सुषमा अंधारे अंधारे यांनी फेसबुकला एक पोस्ट करत लिहिलं की, अशोकराव चव्हाण यांनी राजीनामा दिलाय.. कदाचित भाजपा राज्यसभेसाठी विचार करेल.. देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसमध्ये जननेत्याची घुसमट होत होती असं म्हटलंय.. मी देवेंद्र फडणवीस यांच्या स्टेटमेंटची विशेष वाट बघत होते. कारण हिंदुत्वासाठी अशोकरावांनी काँग्रेस सोडली असं म्हटलं की भक्तांना उमाळे दाटून आले असते.. किती आणि काय काय लिहावं. आपण हुकूमशाहीच्या विरोधात लढाई लढत आहोत. पण धनशक्तीचा जोर इतका दांडगा आहे की, ज्या पक्षाने मंत्री, मुख्यमंत्री केलं त्याच पक्षासोबत सहजासहजी फारकत होताना माणसांची मन जरा सुद्धा विचलित होत नाहीयेत, असं अधारेंनी लिहिलं.

सनी लिओनी अन् डॅनियल वेबरची स्टार्टअप ‘राइज’मध्ये गुंतवणूक; सर्वांच्याच भुवया उंचावल्या 

त्यांनी पुढं लिहिलं की, माझी संविधानिक चौकटीसाठीची ही लढाई लढताना सर्व काही सोसण्याची तयारी आहे. पण असे प्रसंग घडायला लागले की लढाई अजून खडतर होत आहे याची जाणीव होते. अशोकराव चव्हाण यांचे जाणे हे राग यापेक्षा सुद्धा जास्त क्लेश देणारे आहे..संविधानिक लोकशाहीचे सौंदर्य हे विरोधी पक्षांच्या सह अस्तित्वामध्ये आहे परंतु ते सगळे विरोधी पक्षच मोडित निघाले तर उरेल ते फक्त आणि फक्त बेबंदशाही, अशी चिंताही अंधारेंनी व्यक्त केली.

दादा हो , माया हो जागे व्हा रे बाबानो.. तुमची लढाई नेत्यांवर सोपवू नका तुमची लढाई तुम्हालाच लढावी लागणार आहे, असंही अंधारे म्हणाल्या.

ठाकरे काय म्हणाले?
तर भाजप सर्व भाडोत्री लोकं पक्षात घेत आहे. भाजपमधले निष्ठावंत आज सतरंज्या उचलत आहेत. त्या निष्ठावंतांच्या बोडक्यावर या बाजारबुजण्यांगा बसवलं जात आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. भाजपने काँग्रेसमुक्त भारतचा नारा दिला होता. पण आता एवढे सर्व काँग्रेसवाले भाजपमध्ये गेले की, कॉंग्रेसव्याप्त भाजप अशी त्यांची परिस्थिती झाली, अशी टीका ठाकरेंनी केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube