Download App

विखेंना शह देण्यासाठी ठाकरेंचा नगर दौरा; शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन करणार पाहणी

Uddhav Thackeray : राज्याच्या राजकारणात नगर जिल्ह्याचा वेगळाच दबदबा आहे. महसूलसारखे वजनदार खाते जिल्ह्याकडेच आहे. राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या घटना काही दिवसांपासून जिल्ह्यात घडल्या आहेत. नगर जिल्ह्यात दक्षिणेतील भारत राष्ट्र समितीची एन्ट्री झाली आहे. भाजप आमदार बबनराव पाचपुते यांचे पुतणे साजन पाचपुते आणि पूर्वाश्रमीचे शिवसैनिक माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी हाती शिवबंधन बांधलं आहे. त्यामुळे जिल्ह्यात उद्धव ठाकरे गटाचं बळ वाढलं आहे. ठाकरे गटासाठी या पोषक घटना जिल्ह्यात घडलेल्या असतानाच आता खुद्द उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) दुष्काळ पाहणी दौऱ्याच्या निमित्ताने जिल्ह्यात येत आहेत.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज नगर जिल्ह्यात विविध ठिकाणी भेटी देऊन दुष्काळाची पाहणी करणार आहेत.  तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ते दुष्काळाची पाहणी करतील. वरकरणी त्यांचा हा दौरा राजकीय वाटत नसला तरी या दौऱ्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघणार आहे. जिल्ह्यातील शिवसेनेत वेगळाच उत्साह संचारला आहे.  तर भाजपच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. या दौऱ्यात उद्धव ठाकरे राजकीय वक्तव्ये करणार का, याची उत्सुकता आहे. या दौऱ्याच्या माध्यमातून आगामी काळातील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांना शह देण्याचे प्लॅनिंग होणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Radhakrishna Vikhe Patil यांच्यावर उधळला भंडारा; सोलापूर शासकीय विश्रामगृहात घडला प्रकार

पावसाळा संपत आला तरीही राज्यात पाऊस झाला नाही. त्यामुळे सर्वत्र दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या कामात सरकारकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. या मुद्यावर आता विरोधी पक्षांनी आक्रमक रणनीती आखल्याचे दिसत आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दुष्काळग्रस्त भागाचा पाहणी दौरा सुरू केला आहे. या दौऱ्यात आज उद्धव ठाकरे नगर (Ahmednagar) जिल्ह्यात येत आहेत. जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

जिल्ह्यात यंदा पावसाने पाठ फिरवली असल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले असून यामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. या दुष्काळग्रस्त भागाची पाहणीसाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे आज अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. नगर जिल्हा दौऱ्यात ठाकरे संगमनेर आणि राहाता तालुक्यातील दुष्काळी भागात पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

जिल्ह्यात यंदाच्या वर्षी मान्सून सुरू झाल्यापासूनच पावसाने अत्यंत अल्प प्रतिसाद दिला आहे. यातच पावसाने दडी मारल्याने अहमदनगर जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी बळीराजा चिंताग्रस्त झाला असून शेतकऱ्यांची खरिपाची पिके करपून गेली असून जनावरांच्या चाऱ्यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट बनत चालला आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) राहाता तालु्क्यातील राऊत वस्ती, कोलवड गाव येथे दुष्काळी स्थितीची पाहणी करणार आहेत. कोपरगावातील कातरी गावात ते शेतकऱ्यांशी संवाद साधणा आहेत. त्यानंतर उद्धव ठाकरे संगमनेर आणि पुणतांबा येथेही भेटी देणार असल्याची माहिती देण्यात आली.

Maharashtra Rain : दोन दिवस कोसळ’धार’! ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

सरकारकडे दुष्काळ निवारणासाठी तोड नाही – ठाकरे गट

राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. सरकारला एक मुख्यमंत्री आणि दोन अनुभवी उपमुख्यमंत्री लाभले आहेत. या तिघांना अवतारी पुरुष पंतप्रधान मोदींचे आशीर्वाद लाभले आहेत. तरीही महाराष्ट्राचा शेतकरी दुष्काळाने होरपळून गेला आहे. त्याची शेते सुकली आहे. एका बाजूला एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस हे आपापल्या गटातील आमदार, खासदारांवर कोट्यावधींच्या निधीची पावसाप्रमाणे बरसात करत आहेत. पण, पाऊस पाण्याअभावी हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांपर्यंत या लूटमार निधीतला रुपयाही पोहोचत नाही. राजकारणासाठी पैसा आहे पण शेतकऱ्यांसाठी नाही, अशी घणाघाती टीका ठाकरे गटाने  (Uddhav Thackeray) या अग्रलेखात केली आहे.

Tags

follow us