Maharashtra Rain : दोन दिवस कोसळ’धार’! ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

Maharashtra Rain : दोन दिवस कोसळ’धार’! ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

Maharashtra Rain : राज्यात आता मान्सून पुन्हा सक्रिय (Maharashtra Rain) झाला आहे. मागील दोन दिवसांपासून अनेक जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मुंबई-पुण्यातही पावसाने बॅटिंग सुरू केली आहे. पुढील दोन ते तीन दिवसात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये आज मुसळधार पावसाचा (Maharashtra Rain) अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या भागातील जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण गोव्यासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पाऊस पुन्हा सक्रिय होत आहे. राज्यात आजपासून बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

शिवशक्ती परिक्रमा यात्रेत गोंधळ! ‘या’ कारणांमुळं कार्यकर्त्यांची नाराजी; पंकजा मुंडेंनी मागितली माफी

‘या’ कारणामुळे मान्सून पुन्हा सक्रिय

राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय होण्यास बंगालच्या उपसागरात (Maharashtra Rain) बदललेली परिस्थिती कारण ठरली आहे. उपसागरात झालेल्या चक्रवाताच्या परिस्थितीसोबत अरबी समुद्रावरून पश्चिमी वारे वाहू लागले आहेत. यामुळे राज्यात सर्वत्र मान्सून सक्रिय झाला आहे. रविवारपर्यं राज्यात सर्वत्र मध्यम पाऊस होईल. आज शुक्रवारी जळगाव आणि धुळे जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाट परिसरात पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे.

पुणे घाट परिसरात मुसळधार पाऊस होईल. मराठवाड्यात पुढील 48 तासांत मध्यम ते मुसळधार पाऊस (Maharashtra Rain) होईल. सोलापूर आणि सांगली वगळता राज्यातील सर्वच जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.  जळगाव आणि धुळे या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. चक्रवाताच्या परिस्थितीमुळे महाराष्ट्रासह तेलंगणा, मध्य प्रदेशातही पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. अरबी समुद्रावरून येणारे पश्चिमी वारे सक्रिय झाले आहे. यामुळे राज्यात मान्सून सर्वत्र सक्रिय झाला आहे, असे हवामान शास्त्रज्ञ अनुपम काश्यपी यांनी सांगितले. 

Maratha Reservation : मागितलेल्या तिन्ही गोष्टी शासनाने दिल्या, तरीही जरांगे उपोषणावर ठाम का?

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube