Ahmedngar News : रास्तारोको करताच मंत्र्यांचा ताफा थांबला अन् अवघ्या काही तासांत विद्यार्थ्यांचा प्रश्न मार्गी लागला

Ahmedngar News : अहमदनगर शहराजवळील (Ahmedngar News) देहरे येथे एसटी बस थांबविण्याच्या मागणीसाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले, त्या वेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आंदोलनस्थळी थांबून विद्यार्थ्यांशी चर्चा केली. नंतर काही तासांतच एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना कार्यवाहीच्या सूचना दिल्या. त्यामुळे आज शुक्रवारपासून (दि. १२) देहरे येथे बस थांबविण्याचा निर्णय झाल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला. […]

Ahmedngar News : रास्तारोको करताच मंत्र्यांचा ताफा थांबला अन् अवघ्या काही तासांत विद्यार्थ्यांचा प्रश्न मार्गी लागला

Ahmedngar News

Ahmedngar News : अहमदनगर शहराजवळील (Ahmedngar News) देहरे येथे एसटी बस थांबविण्याच्या मागणीसाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले, त्या वेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आंदोलनस्थळी थांबून विद्यार्थ्यांशी चर्चा केली. नंतर काही तासांतच एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना कार्यवाहीच्या सूचना दिल्या. त्यामुळे आज शुक्रवारपासून (दि. १२) देहरे येथे बस थांबविण्याचा निर्णय झाल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला.

Radhakrishn Vikhe : जनतेच्या पैशांच्या लूटीचा हिशेब द्या म्हणत विखेंनी स्वीकारलं रोहित पवारांचं आव्हान

महायुतीच्या बैठकीसाठी नगरकडे जाताना देहेरे येथे विद्यार्थ्यांनी रास्तारोको केला असल्याची बाब मंत्री विखे पाटील यांच्या निदर्शनास आली. मंत्री विखे पाटील यांनी गाडीतून उतरून थेट विद्यार्थ्यांच्या आंदोलनात जावून उभे राहात त्यांचा प्रश्न समाजावून घेतला. देहरे येथून नगर येथील विविध महाविद्यालयात जाणारी विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. परंतू नगरकडे जाणारी एकही बस देहरे येथे थांबवली जात नसल्याने विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत असल्याची तक्रार आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी पालकमंत्र्यांकडे केली.

PM Modi यांचं नाशिकमध्ये आगमन; शिंदे, फडणवीस अन् अजितदादांकडून स्वागत, पाहा फोटो

विद्यार्थ्यांच्या समस्येचं गांभीर्य लक्षात घेवून विखे पाटील यांनी विद्यार्थ्यांना शहरातील बंधन लॉन्समध्ये येण्यास सांगितले. युतीचा मेळावा संपताच त्यांनी विद्यार्थी आणि महामंडळाच्या अधिकार्यांशी चर्चा घडवून आणली. विद्यार्थ्यांच्या मागणीप्रमाणे नगरकडे जाणाऱ्या बसपैकी सात बस उद्यापासून थांबतील आशा पध्दतीची कार्यवाही शुक्रवारपासून सुरू करण्याच्या सूचना दिल्या. तसेच काही अडचण आल्यास माझ्याशी थेट संपर्क करा. असेही त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. सकाळी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्याची मागणी काही तासांत पूर्ण झाल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Exit mobile version