प्रवाशांसाठी गुड न्यूज! आता IRCTC च्या वेबसाईटवरून करता येणार एसटी बसचे बुकिंग
ST bus booking on IRCTC website : आता रेल्वे, विमानाप्रमाणे एसटी बसचेही घरबसल्या बुकिंग करता येणार आहे. यासंदर्भात एसटी महामंडळाने IRCTC (इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन) सोबत सामंजस्य करार केला आहे. IRCTC च्या https://www.bus.irctc.co.in या वेबसाईटवर नजीकच्या काळात तिकीट बूकिंग सुविधा सुरु होणार आहे.
आयआरसीटीसीने महाराष्ट्र राज्य मार्ग पहिवहन महामंडळाची ऑनलाईन बस बुकिंग सेवा सक्षण करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्याची घोषणा केली आहे. आतापर्यंत आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर रेल्वे, विमान, खासगी बस, हॉटेल आदी बुकिंग करण्याची सुविधा होती पण एसटी बसची देखील सुविधा मिळणार आहे.
75 टक्क्यांपेक्षा जास्त प्रवाशी आता आयआरसीटीसीच्या ऑनलाईन तिकीट पोर्टलवरुन त्यांच्या रेल्वे प्रवासाची तिकेट बुक करत आहेत. आता एसटी बस बुकिंगची सुविधाही उपलब्ध झाली आहे.
आयआरसीटीसी आणि एसटी महामंडळ यांच्यातील सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाल्याने प्रवाशांना त्यांच्या प्रवासाची व्यवस्था एकाच ठिकाणी आणि सुलभ पद्धतीने होणार आहे. या एकत्रीकरणामुळे प्रवाशांना सुरळीत प्रवासाची निश्चिंती मिळेल, असे आयआरसीटीसीच्या सीएमडी सीमा कुमार यांनी सांगितले.
ऑगस्ट महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आयआरसीटीसीच्या सीएमडी आणि परिवहन विभागाचे प्रधान सचिव यांच्यात सामंजस्य करार झाला होता.
अधिकृत माहिती नाही; CM शिंदे, अजितदादा अंतरवालीत येत असल्यास स्वागत : मनोज जरांगे
IRCTC च्या वापरकर्त्यांसाठी प्रवास अधिक आरामदायी आणि सोयीस्कर बनवण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. या सामंजस्य करारामुळे रेल्वे, बस, हवाई, जल वाहतूक यासोबत निवास व्यवस्थेसारख्या सर्व पैलूंचे नियोजन करण्यात यश येईल.