Ajit Pawar Pink Jacket Women ask question in Shrigonda : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून घोषणांचा पाऊस केला जात असतानाच आता या योजनांची परिपूर्ण माहिती देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आजपासून राज्यव्यापी दौऱ्याला सुरुवात केलीयं. वाढदिवसांच्या दिवशीच अजितदादांनी अहमदनगरमधील पारनेर तालुक्यात महिलांच्या योजनांबद्दलच्या अडचणी समजून घेण्यासाठी थेट लाडक्या बहिणींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी परिधान केलेल्या गुलाबी रंगाच्या जॅकेटवर एका महिलेने प्रश्न विचारला असता. अजित पवारांनी खास उत्तर दिलं.
‘लाडकी बहीण’ योजनेनंतर आता ‘गुलाबी रिक्षा’ योजना; कोणत्या शहरात किती रिक्षा मिळणार?
या महिलेने अजितदादांना विचारले होते की, तुम्ही गुलाबी रंगाचे जॅकेट का घालता आहात? त्यावर अजित पवार म्हणाले की, तुम्हीच जशा वेगवेगळ्या रंगाच्या साड्या नेसता. त्यातील काही साड्या तुम्हाला चांगल्या दिसतात. त्यामुळे तुम्ही त्या आवडीने नेसता. तसेच या रंगाचे जॅकेट मला चांगलं दिसतं. असं काही जणांनी सांगितलं. म्हणून मी ते जॅकेट वापरत आहे. दुसरं काहीही कारण यामागे नाही. असं उत्तर अजित पवार यांनी दिलं.
‘बॅड न्यूज’चा चौथ्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर जलवा; विकीच्या चित्रपटाची दमदार कमाई, वाचा आकडे
दरम्यान या कार्यक्रमामध्ये महिलांच्या योजनांची माहिती देताना अजित पवार यांनी विरोधकांच्या ‘चुनावी जुमला’च्या टीकेवरुन विरोधकांना रडारवर घेतल्याचं दिसून आले आहेत. विशेष म्हणजे अजित पवार यांनी आज आपल्याला कोटाला पत्नी सुनेत्रा पवार यांनी दिलेलं फुल लावून आल्याचं दिसून आले आहेत. त्यामुळे अजितदादांनी सुनेत्रावहिनींनी दिलेलं फुल काळजाला लावल्याचंच पाहायला मिळालं.
बहीणी सक्षम झाल्या तरच…
आम्ही गोरगरीब मध्यमवर्गीय महिलांना फुल न फुलाची पाकळी देत आहोत. याला विरोधक चुनावी जुमला म्हणत आहेत. एवढंच नाही तर विरोधक म्हणतात बहीणींना दिलं भावाला काय? जर बहीणी सक्षम झाल्या तरच देश पुढ जाईल ना? असा थेट सवाल अजित पवार यांनी विरोधकांना केलायं.