Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ( Arvind Kejriwal ) यांना अटक करण्यात आली आहे. दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीने त्याच्यावर मोठी कारवाई केली आहे. सलग नऊ समन्सकडे दुर्लक्ष केल्याने केजरीवाल यांना अटक होऊ शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात आधीपासूनच होती. हे यावर बोलताना अण्णा हजारे यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, मी अनेकदा त्यांना पत्र दिले होते मात्र त्यांनी त्यावर काहीही पाऊल उचलले नाही.
Urvashi Rautela: काय सांगता…? लोकसभा निवडणूक लढवणार उर्वशी रौतेला?
यावर बोलताना अण्णा हजारे यांनी टीका केली आहे. दारूमुळे देशात अनेक लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले दारू बंद झालीच पाहिजे मी अनेकदा त्यांना पत्र दिले होते मात्र त्यांनी त्यावर काहीही पाऊल उचलले नाही आज दारू कांडा मध्ये त्यांना अटक झाली आहे जर त्यांनी चूक केली असेल तर त्यांना शिक्षा मिळाली पाहिजे आणि काहीही संबंध येत नाही.
Pankaja Munde: ‘मला आशीर्वाद द्यायला कोणी नाही, पंकजा मुंडे यांची भावनिक साद
दरम्यान दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी ईडीचे (ED) एक पथक गुरूवारी रात्री मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal a) यांच्या निवासस्थानी दाखल झालं होतं. दोन तास केजरीवाल यांची चौकशी केल्यानंतर ईडीने त्यांना अटक केली आहे. केजरीवाल यांना उत्पादन शुल्क प्रकरणात चौकशीसाठी ईडीने वारंवार समन्स पाठवूनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं होतं.
त्यांना ईडीने यापूर्वी 9 वेळा समन्स बजावले आहे. मात्र ते चौकशीसाठी हजर होत नव्हते. दरम्यान, ईडीच्या अटकेपासून संरक्षण मिळावे या मागणीसाठी त्यांनी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. परंतु उच्च न्यायालयाने अटकेतून दिलासा देण्यास नकार दिला. त्यानंतर आज लगेच (21 मार्च) ईडीचे अधिकारी केजरीवाल यांच्या घरी पोहोचले होते. तेव्हाच त्यांच्यावर कारवाई होणार असल्याची कुणकुण लागली होती.