Urvashi Rautela: काय सांगता…? लोकसभा निवडणूक लढवणार उर्वशी रौतेला?
Urvashi Rautela On Loksabha Election: बॉलिवूडची (Bollywood) स्टाइल आयकॉन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री उर्वशी रौतेलाने (Urvashi Rautela) एक मोठी घोषणा केली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) चर्चेदरम्यान अभिनेत्रीने ती निवडणूकही लढवण्याचे संकेत दिले आहेत. अभिनेत्रीने तिकीट मिळाल्याचे देखील सांगितले आहे. मात्र, तिला कोणत्या जागेवरून ही जागा मिळाली हे तिने सांगितलेले नाही आणि निवडणूक लढवणार की नाही हेही सांगितले नाही. या माहितीमुळे उर्वशीचे चाहते खूप खूश आहेत.
सध्या अभिनेत्रीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर (social media) शेअर करण्यात आला आहे. यामध्ये ती स्वतः याबद्दल सांगताना दिसत आहे. ती म्हणते, “मला तिकीट मिळाले आहे पण मी हे करायचे की नाही हे मला ठरवायचे आहे. मला याचा भाग व्हायचे आहे की नाही? मी राजकारणात यायचे की नाही, तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये तुमचे मत मांडा, असे अभिनेत्रीने वक्तव्य केल्याचे दिसत आहे.
View this post on Instagram
उर्वशीला राजकारणातील तिची आवड याबद्दल विचारण्यात आले होते, तिच्या उत्तरात तिने तिकीट मिळणार असल्याचे सांगितले. उर्वशी राजकारणात येण्याच्या वृत्ताने सर्वांनाच आश्चर्याचा मोठा धक्का बसला आहे. यावर सोशल मीडिया यूजर्सकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. तिने राजकारणात प्रवेश केला तर बरे होईल असे अनेकांचे म्हणणे आहे, तर काहींचे म्हणणे आहे की तिने केवळ अभिनय करिअरवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
चाहत्यांचे कॉमेंट्स
एका युजरने लिहिले आहे की, “लोक या अभिनेत्यांना इतक्या मोठ्या पदावर का बसवत आहेत आणि त्यांना भारतीय लोकांसाठी काम करण्याची ताकद का देत आहेत?” तर आणखी एका वापरकर्त्याने लिहिले की, “चित्रपटाची तिकिटे मिळाली असावीत, त्यांचा गैरसमज झाला. अशा भन्नाट कॉमेंट्स सध्या चाहते करत आहेत.
Nargis Fakhri: ‘योग्य चित्रपट निवडण्यामागे नक्की काय हेतू’? अभिनेत्रीने सांगितली खास गोष्ट
उर्वशी रौतेलाच्या आधी बॉलिवूड क्वीन कंगना राणौतनेही एक इशारा दिला होता. काही काळापूर्वी एका कार्यक्रमात कंगनाला राजकारणात येण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. ज्याला अभिनेत्रीने थेट सांगितलं होते की, “मी निवडणूक लढवायची की नाही हे जाहीर करण्याचा अधिकार मला नाही.” असं म्हणत ती हसायला लागली. ती पुढे म्हणाली की, “मला जागरूक व्यक्ती होण्यापासून कधीही रोखले गेले नाही. तथाकथित जागेवरूनही लोक काय करू शकतात यापेक्षा मी या देशासाठी जास्त केले आहे. मी चित्रपटाच्या सेटवरून राजकीय पक्षांशी लढले आहे. मला दूर ठेवता येणार नाही. मला माझ्या देशासाठी जे करायचे आहे, ते करायला मला जागा मिळत नाही. पण, जर मला राजकारणात प्रवेश करायचा असेल तर कदाचित हीच योग्य वेळ असणार आहे असे मला वाटते.