Urvashi Rautela: उर्वशी रौतेलाच्या ‘जेएनयू’ चित्रपटाचा धमाकेदार पोस्टर रिलीज

Urvashi Rautela: उर्वशी रौतेलाच्या ‘जेएनयू’ चित्रपटाचा धमाकेदार पोस्टर रिलीज

Urvashi Rautela JNU Poster Released: जहांगीर नॅशनल युनिव्हर्सिटी’ चे (Jahangir National University) पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. उर्वशीने (Urvashi Rautela) तिच्या सोशल मीडिया (Social Media) अकाउंटवर चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये भारताचा नकाशा भगव्या रंगात दिसत आहे. पोस्टरमध्ये दाखवलेला भारताचा नकाशा मुठीत धरून ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पोस्टर रिलीज झाल्यानंतर हा चित्रपट सोशल मीडियावर चर्चेत आहे.

इन्स्टाग्रामवर चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना उर्वशीने लिहिले आहे की, शिक्षणाच्या बंद भिंतींच्या मागे देश तोडण्याचे षडयंत्र रचले जात आहे, डावे आणि उजवे टक्कर होताच, वर्चस्वाची ही लढाई कोण जिंकणार? महाकाल मूव्हीज प्रस्तुत जहांगीर राष्ट्रीय विद्यापीठ. रवी किशन आणि उर्वशी रौतेला या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत, जे विद्यापीठातील विद्यार्थ्यांची कथा साकारतील आणि मोठ्या पडद्यावर दाखवतील. उर्वशी रौतेला आणि रवी किशन यांच्याशिवाय या चित्रपटात सिद्धार्थ बोडके, पियुष मिश्रा, रश्मी देसाई, सोनाली सहगल आणि विजय राज हे कलाकारही दिसणार आहेत.

तरण आदर्शने हे पोस्टर शेअर केले

हे पोस्टर शेअर करताना तरण आदर्शने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, जेएनयू चित्रपटाचे पहिले पोस्टर आऊट झाले आहे, चित्रपट 5 एप्रिलला रिलीज होतोय, शिक्षणाच्या बंद भिंतींमागे देश तोडण्याचे षडयंत्र रचले जात आहे.

‘बंगाल 1947: ॲन अनटोल्ड लव्ह स्टोरी’चे पोस्टर रिलीज

टीव्ही शो ‘साथ निभाना साथिया’ फेम अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जीने इंस्टाग्रामवर ‘बंगाल 1947: एन अनटोल्ड लव्ह स्टोरी’चा फर्स्ट लूक पोस्टर रिलीज केला आहे. हा चित्रपट ऐतिहासिक फाळणीच्या पार्श्वभूमीवर आधारित असणार आहे. पोस्टर शेअर करताना त्यांनी लिहिले, ‘बंगाल 1947’ फाळणीच्या नाटकाचा फर्स्ट लूक. फाळणीच्या काळातील प्रेमकथा चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. देवोलिना या चित्रपटात मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे.

मानाचि लेखक संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त उत्स्फूर्त एकांकिका स्पर्धेचे आयोजन

देवोलीना भट्टाचार्जी व्यतिरिक्त, बंगाल 1947 या चित्रपटात सोहेला कपूर, ओंकार दास माणिकपुरी, आदित्य लखिया, अनिल रस्तोगी, प्रमोद पवार, अंकुर अरमाम, सुरभी श्रीवास्तव, फलक राही, विक्रम टीडीआर आणि अतुल गंगवार यांसारख्या अनेक कलाकारांचा समावेश आहे. हा चित्रपट 29 मार्चला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube