Nargis Fakhri: ‘योग्य चित्रपट निवडण्यामागे नक्की काय हेतू’? अभिनेत्रीने सांगितली खास गोष्ट

Nargis Fakhri: ‘योग्य चित्रपट निवडण्यामागे नक्की काय हेतू’? अभिनेत्रीने सांगितली खास गोष्ट

Nargis Fakhri On Film Career: अभिनेत्री नर्गिस फाक्री (Nargis Fakhri) गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये (Bollywood) जोर धरत होती. नर्गिस फाखरी ही कायम वैविध्यपूर्ण भूमिका साकारून चर्चेत असलेली अभिनेत्री आहे. तिच्या फिल्मोग्राफीवर एक नजर टाकली की हा प्रवास अगदीच समजून येतो. नाटकापासून ते कॉमेडीपर्यंत नर्गिसने विविध शैलींच्या भूमिका साकारल्या आहेत आणि प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.

खरं तर तिचे बहुतेक चित्रपट ब्लॉकबस्टर आहेत आणि यातून तिने एक उत्तम अभिनेत्री असल्याचं सिद्ध केलं आहे. ‘रॉकस्टार’, ‘अझहर’ ते ‘मैं तेरा हिरो’ आणि ‘हाऊसफुल 3’ सारख्या चित्रपटांमधून तिने कायम आपल्या अभिनयाची जादू सगळ्यांना दाखवून दिली. एखादा प्रोजेक्ट कसा निवडावा? त्या मागची काय विचार शैली आहे. याबद्दल नर्गिसने पहिल्यांदाच थेट भाष्य केले आहे. “मला कथाकथनाच्या सामर्थ्यावर विश्वास आहे. मी एक कलाकार म्हणून मला आव्हान देणाऱ्या नव्या भूमिका करते.

Ramayan: रणबीरचा ‘रामायण’ पुन्हा अडचणीत; नेमकं प्रकरण काय?

मी अशा भूमिका शोधते, ज्या मला सिनेमात अर्थपूर्ण काम देऊ शकतील. प्रत्येक प्रकल्प असा असावा जो माझ्या कलात्मक प्रवासात एक पाऊल पुढे जाऊन प्रेक्षकांना मोहित करणारा असावा.तिच्या भूमिकेची लांबी तिच्यासाठी कशी महत्त्वाची आहे. याबद्दल अभिनेत्रीने थेटच वक्तव्य केले आहे. म्हणाली की “मला असे वाटते की चित्रपट नेहमीच तुमच्या पात्राच्या लांबीवर अवलंबून नसतात.

परंतु संदेश आणि प्रभाव आणि प्रेक्षक पात्रांशी कसे जोडले जातात यावर तो आधारित असणार आहे. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर नर्गिस फाखरी शेवटची ‘ततलुबाज’मध्ये दिसली होती.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube