Download App

कांदा निर्यातबंदी कायम! शेतकरी आक्रमक, बाजार समितीच्या आवारात निषेध आंदोलन !

  • Written By: Last Updated:

अहमदनगर – केंद्राने दोन दिवसांपूर्वी कांदा निर्यातबंदी (Onion export ban) उठवण्यात आल्याचं सांगितलं. तसं वृत्तही माध्यमांत झळकले. त्यामुळे निर्यात खुली झाल्याची चर्चा सुरू असतांनांच केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाचे सचिव रोहित कुमार सिंह (Rohit Kumar Singh) यांनी कांदा निर्यातबंदी उठवल्याबाबत सरकराने कोणेतही नोटीफिकेशन काढले नाही. कांदा निर्यात बंदी ३१ मार्चपर्यंत कायम राहणार असल्याचं वक्तव्य केलं. दरम्यान, शेतकऱ्यांच्या (farmer) आशा पुन्हा मावळल्या. त्यामुळं आता नगर जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत.

पुणे लोकसभा : वडगाव शेरीची ताकद मुळीक यांच्यासाठी बूस्टर ठरणार 

कांदा निर्यातबंदी उठवल्याचे वृत्त आल्यानंतर दुसऱ्या दिवशी थोडीफार भावात सुधारणा झाली होती. मात्र, लगेचच सरकारने कांदा निर्यातबंदी ३१ मार्चपर्यंत कायम राहणार असल्याचं सागितलं. त्यामुळं कांदा उत्पादक, व्यापारी यांना मोठया प्रमाणात आर्थिक फटका बसत आहे. या सर्व बाबीचा निषेध करण्यासाठी पारनेर कृषि उत्पन्न बाजार समिती येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्र येवून निषेध आंदोलन केले. यावेळी शेतकऱ्यांनी गेल्या तीन ते चार वर्षापासून कांद्याचा उत्पादन खर्च ही निघत नाही, अशा स्थितीत नसतांना शासन फक्त पिकवणाऱ्यांपेक्षा खाणाऱ्यांचा जास्त विचार करीत आहे, अशा भावना व्यक्त केल्या.

अजय महाराज बारस्करांची प्रहारमधून हकालपट्टी, जरांगेंवर टीका केल्यानं बच्चू कडूंचा मोठा निर्णय 

शेतकऱ्यांच्या कोणत्याही शेतमालाला सध्या कवडी मोल भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकरी खऱ्या अर्थाने कर्ज बाजारी झालेला असून आता आत्महत्तेशिवाय शेतकऱ्यांपुढे पर्याय नसल्याचे तीव्र भावना शेतकरी वर्गातून व्यक्त करण्यात आल्या. यावेळी व्यापारी वर्गामार्फतही शेतकऱ्यांना पाठींबा देवून व्यापारी हे शेतकऱ्यांचे शेतमालाला योग्य भाव देण्याचा प्रयत्न करतात. परंतु शासनाने अशा निर्णयामुळे भावातील चढ उतारामुळे व्यापारी वर्गाला आर्थिक फटका बसतो, असे व्यापारी असोसिएशनने सांगून निषेध व्यक्त केला.

यावेळी बाजार समितीचे सभापती बाबासाहेब तरटे यांनी केंद्र शासनाची भूमिका कायम शेतकरी विरोधी असून यापूर्वी ही आम्ही निर्यात बंदी उठविण्याबाबत मागणी केली. पण ही शासनाने शेतकऱ्यांची फसवणुक केली. याबाबत शेतकऱ्यांनी शासनाचे विरोधात रस्त्यावर उतारण्याचे आवाहन तरडे यांनी केले. आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनाला नेहमीच बाजार समितीचे सर्व संचालक मंडळाचा पाठींबा राहील, असे जाहीर केले.

तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही निर्यातबंदी धोरणावर सडकून टीका केली. स्वत:च्या सरकारने लादलेली कांदा निर्यात बंदी उठवण्यात आल्याचा जल्लोष करून स्वत: श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न राज्यातील भाजपचने मंत्री करत आहे. गाजावाज करत जल्लोष करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भ्रमित करण्याचा भाजपचा हा प्रयत्न होता का? असा सवाल वडेट्टीवारांनी केली.

तर कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भरत दिघोळे म्हणाले की, सरकारने कांदा निर्यातबंदी तात्काळ उठवली नाही तर आगामी लोकसभा निवडणुकीत शेतकरी मतपेटीतून याचे उत्तर देतील, असा इशारा दिघोळे यांनी दिला आहे.

 

follow us