Ashok Kharat arrested in rape case: महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नाशिकमधील कथित भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) आता पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय. त्याच्या मंदिरावर, आश्रमावर पोलिसांनी छापा टाकलाय. त्याने हजारो कोटींची माया जमविले होती. अनेक राजकीय नेते त्याचे भक्त होते. त्या जोरावर महिलांवरील अत्याचारातून सुटण्यासाठी अशोक खरातसाठी राजकीय नेत्यांनी व पोलिसांनी कशी मदत केलीय, याची स्टोरी आता समोर येत आहे.
अनेक नेते भक्त, चाकणकर तर संस्थेवर विश्वस्त
बडे नेते, उच्चपदस्थ अधिकारी हे अशोक खरात याच्या आश्रमात जात होते. मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे हे आश्रमात गेले होते. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या अशोक खरात याच्या संस्थेवर विश्वस्त आहेत. दादा भुसे, सुनील तटकरे, राधाकृष्ण विखे हे आश्रमात जात होते. नाशिकचा एक पोलिस अधिकारी या बाबाच्या चरणी लोटांगण घालत होता.
तेव्हाच बाबाच पितळ उघड पडल असतं
खबरदार पुढारी या स्थानिक वृत्तपत्राने अशोक खरातविरुद्ध महिलेने तक्रार प्रसिद्ध केली. बोगस बाबांपासून, कॅप्टनपासून सावध राहा, असे वृत्त होतं. पण त्यात अशोक खरात याचे नाव घेतलेले नव्हते. या खबरदार पुढारीने बाबांचा पितळ उघड पाडलं होतं. राज्य महिला आयोगाचे अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी खबरदार पुढारीच्या संपादकाला नोटीस पाठविली होती. तुम्हा अशा पद्धतीने बातम्या प्रसिद्ध करून महिलांची बदनामी करत असल्याचे नोटीसात म्हटलं होतं. या नोटीसाच्या आधारे अशोक खरातनेही खबरदार पुढारीला कायदेशीर नोटीस पाठविली होती. तेव्हाच राज्य महिला चौकशी केली असती तर अशोक खरात ताब्यात आला असता.
बाबांनी दोघांना अडकविण्याचा डाव रचला
नाशिकमधील सिन्नर तालुक्यात अशोक खरात याचा ट्रस्ट आणि एक मंदिर आहे. गेल्या वर्षी दिनेश परब या व्यक्तीविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. अशोक खरात यानेच हा गुन्हा दाखल केला होता. दिनेश परबने तीन कोटी रुपये मागितल्याचा हा गुन्हा होता. मॉर्फ केलेले फोटोसाठी तीन कोटी रुपये मागितलला हा गुन्हा होता. विशेष म्हणजे गुन्हा दाखल झालेली व्यक्ती दिनेश परब हा अशोक खरातला वडिलांसारखा मानत होता. अशोक खरातचे अनेक चाळे आहेत. त्याने अनेक महिलांना छळले आहेत. तेव्हाच परबने अशोक खरात असे करू नये, असे सांगितले आहे. दिनेश परब हा आपले बिंग फोडले म्हणून हा गुन्हा दाखल केला होता. तेव्हा दिनेश परबकडील व्हिडिओ पुरावेही अशोक खरातला काढून घ्यायचे होते. त्यावेळी रायगडचा एक नेता नाशिकच्या गेस्ट हाऊसला आला होता. तेव्हा त्यांनी नाशिकच्या पोलिस अधिकाऱ्याला एक जबाबदारी दिली होती. दिनेश परबला पकडून त्याच्याकडील व्हिडिओ अशोक खरातला परत करायचे सांगितले होते. त्याचवेळी खरात याच्या घरात लग्न होते. तेव्हा रुपाली चाकणकर, रायगडचे नेता लग्नाला गेला होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विवाहाला जाणार होते. परंतु हे प्रकरण काही गडबडीचे आहे. तुम्ही आलं नाही तर बरं होईल, असे पोलिसांनी सुचविले होते. एकनाथ शिंदे हे विमानतळावरून माघारी गेले होते.
ऑफिस बॉयविरुद्ध गुन्हा
अशोक खरातच्या कार्यालयात काम करणाऱ्या ऑफिस बॉय जाधवविरुद्ध फेब्रुवारी 2026 ला शिर्डीमध्ये गुन्हा दाखल केला होता. एका मुलीच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल केला होता. मॉर्फ व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणी मागत असल्याचा गुन्हा होता. शिर्डीतील पोलिस अधिकाऱ्याने हा गुन्हा दाखल केला होता. या पोलिस ठाण्यातील एक अधिकारी अशोक खरातचा भक्त होता. या तक्रारीवर तुम्ही संबंधित ऑफिस बॉयला ताब्यात घ्या. सगळी व्हिडिओ मिळवा आहे. महिलांची सुरक्षतेचा प्रश्न असल्याचे चाकणकर यांनी सूचना दिलेल्या होत्या.
राज्याच्या पोलिस महासंचालकाकडे याबाबत बैठक झाली होती. या बैठकीला श्रीरामपूरचे अतिरिक्त एसपी उपस्थित होते. हे व्हिडिओ ताब्यात घेऊन अशोक खरातला ताब्यात घेतले पाहिजे, अशी मागणी करायली हवी होती. परंतु तशी मागणी झाली नाही. अशोक खरातचे मॉर्फ व्हिडिओ बनविले आहेत. 59 व्हिडिओ असून, अशोक खरात गुरुला वाचवा, अशी मागणी झाली आहे. मग पोलिसांना संशय आला आहे.
मुलीची तक्रारीची चौकशी सुरू झाल्यानंतर संशय आला
या मुलीच्या तक्रारीची चौकशी सुरू झाली. मग पोलिसांना संशय आला आहे. त्यामुळे आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी नेमण्यात आली आहे. फेब्रुवारी महिन्यात तपास प्रमुख सातपुते यांची नियुक्ती झाली होती.महिलांची बदनामी करणारे व्हिडिओ हस्तगत करायचा टास्क होता. परंतु नाशिकमधील सरकारवाडा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल बिंग फुटलं. तेजस्वी सातपुतेंची एसआयटी वाचविण्यासाठी होती की पकडण्यासाठी होती असा संशय आता येत आहे.
