शेतजमीन, फॉर्महाऊस ते भूखंड; भोंदू अशोक खरातकडे कोट्यवधींची माया…

Ashok Kharat : नाशिक, शिर्डी भागात त्याच्या शेतजमीन, प्लॉट असल्याचे उघडकीस आले आहे. त्याच्या संपत्तीचे काही कागदपत्रे हाती आले आहेत.

Ashok Kharat Property

Ashok Kharat Property

Ashok Kharat Property : अंकशास्त्राच्या नावाखाली भविष्य सांगून महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अशोककुमार एकनाथ खरात (Ashok Kharat) उर्फ कॅप्टन हा पोलिस कोठडीत आहे. बडे राजकारणी, उद्योजक हे अशोक खरातच्या आश्रमात येत होते. त्याचे कागदपत्रेही समोर येत आहे. आता त्याची संपत्तीही हळूहळू उघडकीस येत आहे. अनेकांबरोबर भागीदारीत संपत्ती खरेदी केली आहे. त्याचे घरातील कुटुंब, नातेवाइकांच्या नावावर संपत्ती आहे. नाशिक, शिर्डी भागात त्याच्या शेतजमीन, प्लॉट असल्याचे उघडकीस आले आहे. त्याच्या संपत्तीचे काही कागदपत्रे हाती आले आहेत. त्याची संपत्ती कुठे-कुठे आहेत हेच या व्हिडिओतून पाहुया…

अशोक खरातकडे 200 कोटींची संपत्ती जमविल्याची माहितीसमोर येत आहे. तर काही कागदपत्रांवरून संपत्ती यापेक्षा जास्त असल्याचे बोलले जात आहे. नाशिक शहरातील गोविंदनगर परिसरातील एक अलिशान बंगला, कॅनडा कॉर्नर परिसरात ऑफिस, पाथर्डी परिसरात कोट्यावधींची 30 एकर जमीन आणि सिन्नर, ओझर विमानतळ पसिरातील शिर्डीतील कोट्यवधींच्या जमिनीचा समावेश आहे.


पाथर्डी गावामध्ये सर्वाधित शेतजमीन

सिन्नरमधील मिरगाव येथे खरातचे फार्महाऊस आहे. खरातची संपत्ती नाशिकमधील पाथर्डी गावात सर्वाधिक आहे. पाथर्डीमध्ये वीस ठिकाणी त्याची संपत्ती आहे. या गावामध्ये त्याची 30 एकरहून अधिक शेती असून, त्या जमिनीचे बाजारभावाने तब्बल दीडशे कोटी रुपये किंमत आहे. यात एक शेतजमिन अतिरिक्त जिल्हाधिकारी अभिजित भांडे पाटील यांची पत्नी प्रिती व अशोक खरात यांची मुलगी तृप्तीबाला यांनी एकत्रित खरेदी केलेली आहे.

ती जमिन 40 आर म्हणजेच सुमारे एकरभर आहे. यातील काही जमिन अशोककुमार खरातच्या नावावर आहेत. तर काही गावातील जमीन ही कल्पना अशोककुमार खरात हिच्या नावावर आहे. तर पाथर्डीमधील पाच एकर जमीन दत्तात्रय एकनाथ खरातच्या नावावर आहे. तर एका ठिकाण जमीन श्रृष्टी अशोककुमार खरातच्या नावावर आहे. नाशिक शहरात पत्नी कल्पना अशोककुमार खरातच्या नावावर 273 चौरस मीटर भूखंड आहे. गोळावणे गावात 71 आर म्हणजे सुमारे दोन एकर जमीन आहे. आडगावमध्येही कल्पनाच्या नावावर भूखंड आहे. तर विल्होळी गावात बीनशेती भूखंड असून तो सुरेखा दिलीप खरातच्या नावावर आहेत.

राहाता तालुक्यात शेतजमीन
काही शेतजमिनी या अशोककुमार खरात आणि कल्पना खरात या दोघांच्या नावे आहेत. शिर्डीमध्ये कल्पना खरातच्या नावावर 30 आर जमीन आहे. तर राहाता तालुक्यातील निमगाव कोऱ्हाळे येथे अशोक खरातच्या नावावर बिनशेती प्लॉट आहे. तर राहाता तालुक्यातील निघोजमध्ये अशोक आणि कल्पनाच्या नावावर 1 हेक्टर 60 आर शेतजमीन आहे. सिन्नरमध्ये चार ठिकाणी, तर कुंदेवाडीमध्ये तीन ठिकाणी प्लॉट आहे.

सर्व ठिकाणच्या जमिनी एकत्र केल्यास अशोक खरात, त्याची पत्नी, दोन्ही मुली, आई व इतर नातेवाइकांच्या नावावर सुमारे 50 एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे. ही संपत्ती ही केवळ उघड झालेल्या कागदपत्रांवरून दिसून येत आहे. कॅप्टन सेवानिवृत्त झाल्यानंतर अंकशास्त्राचे माध्यमातून भविष्य सांगत आणि भोंदूबाबागिरी करून ही संपत्ती खरातेनेही जमविली आहे. या प्रकरणात पोलिसांनी सखोल चौकशी केल्यास या भोंदूबाबाचे आणखी कारनामे आणि संपत्तीही उघडकीस येऊ शकते.

Exit mobile version