Download App

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का, बबनराव घोलपांचा उपनेतेपेदाचा राजीनामा

  • Written By: Last Updated:

Babanrao Gholap : पक्ष बांधणीसाठी मैदानात उतरलेले उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना नाशिकमध्ये आणखी एक मोठा धक्का बसला आहे. गेल्या पंचवीस वर्षांपासून ठाकरेंबरोबर असलेले माजी मंत्री बबनराव घोलप (Babanrao Gholap) यांनी उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून (Shirdi Loksabha) ते इच्छूक होते. परंतु एेनवेळी माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना पुन्हा पक्षात घेतले. तर शिर्डीच्या संपर्कप्रमुखपदावर हटविण्यात आले आहे. या दोन्ही कारणांमुळे घोलपांनी उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे.

‘मला मनोहर जोशींचं घर जाळायला सांगितलं होतं’; आमदाराच्या गौप्यस्फोटाने खळबळ

बबनराव घोलप हे गेल्या दहा वर्षांपासून शिर्डीतून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते. 2014 मध्ये शिवसेनेने त्यांची उमेदवारी जाहीर केली होती. परंतु एका भ्रष्टाचाराच्या प्रकरणात न्यायालयाने तीन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यामुळे एेनवेळी सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यावेळी घोलपांचा मुलगा योगेश घोलपही इच्छुक होते. आता पुन्हा 2024 साठी घोलप हे शिर्डीतून इच्छुक होते. त्यांनी तयारी सुरू केली होती. परंतु एेनवेळी उद्धव ठाकरे यांनी माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना पुन्हा पक्षात घेतले आहे. तसेच त्यांनी उमेदवारीचा शब्दही देण्यात आला आहे. त्यामुळे घोलप ही नाराज झाले होते.

जसं जालियनवाला बाग काडं झालं, तसं ‘जालन्या’वाला घडवला; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर घणाघात

काही दिवसांपूर्वी घोलप ही शिर्डीतील काही पदाधिकारी घेऊन थेट मातोश्रीवर गेले होते. त्या ठिकाणी जोरदार खडाजंगी झाली होती. त्यानंतर नाराज झालेल्या उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वीच बबनराव घोलप यांना शिर्डीच्या संपर्कप्रमुखपदावर हटविले आहे. त्यांची जागी माजी आमदार विलास शिंदे यांची नियुक्ती केली आहे.

त्यामुळे नाराज झालेल्या बबनराव घोलप यांनी रविवारी उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. बबनराव घोलप यांनी व्हाटसअॅपच्या द्वारे आपला राजीनामा उद्धव ठाकरे यांना पाठविला आहे. राजीनामा देण्याबाबत घोलप म्हणाले, शिवसेनेच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिलाय. मी सध्या शिवसैनिक आहे. माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आता लोकसभा संपर्कप्रमुखपदावरून मला काढण्यात आले आहे. त्यामुळे मी राजीनामा दिला असल्याचे घोलपांनी स्पष्ट केले.

Tags

follow us