Big update in Dhule government rest house cash case! Absconding Rajkumar Mogle in police custody : धुळ्यातील शासकीय विश्रामगृहामध्ये सापडलेल्या कोट्यावधींचं घबाड सापडलं होतं. या प्रकरणामध्ये आता मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणामध्ये फरार असलेल्या राजकुमार मोगले याला पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले आहे. गेल्या 11 दिवसांपासून फरार होता. त्याअगोदर सोमवारी अनिल गोटे यांचा देखील जबाब नोंदवण्यात आला आहे. त्यावेळी रोकडसह मोगलेचं ओळखपत्र मिळालेलं होतं.
नेमकं प्रकरण काय?
विधिमंडळ आमदारांची समिती धुळे जिल्हा दौऱ्यावर असताना या समितीसाठी कोट्यावधी रुपयांचा मलिदा देण्यासाठी धुळ्यातील शासकीय विश्रामगृहावर कोट्यावधी रुपये जमा करण्यात आल्याचा दावा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी फेसबुक पोस्टद्वारे केला होता. त्यानंतर पोलिसांनी धाड मारली. यावेळी रुम नं 102 मध्ये पोलिसांना एक कोटी 84 लाख 84 हजार रुपयांची रोकड आढळून आलीयं. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलायं.
दरम्यान या प्रकरणामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार अनिल गोटे यांनी धुळ्याच्या गुलमोहर शासकीय विश्रामगृहात (Dhule) आमदारांना देण्यासाठी पाच कोटी रुपये आणल्याचा गंभीर आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर अनिल गोटे यांनी विश्रामगृहातील खोली क्रमांक 102 ला बाहेरून कुलूप लावून तेथेच ठाण मांडलं होतं. खोलीत घेतलेल्या झडतीमध्ये तब्बल एक कोटी 84 लाख 84 हजार 200 रुपयांची रोकड आढळली होती. याच पार्श्वभूमीवर लेट्सअप मराठीने अनिल गोटे यांच्यासोबत विशेष संवाद साधला होता.
चलनातून 500 रुपयांच्या नोट बंद होणार? PM मोदींच्या निकटवर्तीयाची जाहीर सभेत मागणी अन्..
यावेळी बोलताना माजी आमदार अनिल गोटे यांनी म्हटलंय की, काल धुळ्यात रेस्ट हाऊसमध्ये जो प्रकार घडला, तो पैसा अधिकाऱ्यांचा होता. महाराष्ट्र विधान मंडळाच्या अंदाज समिती आली होती. दरवेळेला अधिकाऱ्यांना असे पैसे दिले जातात. अधिकाऱ्यांकडून असे पैसे घेतले (Maharashtra Politics) जातात. मी आमदार असताना मी कमिटीमध्ये होतो. ही रक्कम थोडी थोडकी नसते, प्रचंड मोठी असते. त्यावेळचे कलेक्टर, एसपी, जिल्हा परिषद सीईओ या सगळ्यांशी माझं भांडणं झालं होतं. तुम्ही पैसे का गोळा करत आहात?
Video : लाईव्ह कॅमेरासमोर तरूण नग्नावस्थेत बसला, लोकांनी QR कोड स्कॅन केला अन्…
ते म्हणाले आम्ही पैसे गोळा करत नाही. त्यांना दुसऱ्या दिवशी पाच लाख रूपये देताना पकडलं. ती भानगड सरकारने मिटवून टाकली. जिल्हा दौऱ्यावर येणाऱ्या सगळ्यांच समितीच्या अध्यक्षांना, त्यामध्ये सदस्य असतील, आमदार असतील त्यांना खूश करण्याचा प्रयत्न आहे. तिथे पाच दिवसापासून एका आमदाराचा पीए राहात होता. त्याचेच हे पैसे होते. किशोर पाटील, असं नाव देखील अनिल गोटे यांनी लेट्सअप मराठीसोबत बोलताना घेतलं आहे.
अर्जून खोतकरांनी आरोप फेटाळले आहेत, यावर अनिल गोटे म्हटले की, आरोप कोणी कबूल करत नाही. पैसे पाच कोटी होते. मी जायच्या आधी त्यांनी काही पैसे एका अनोळखी गाडीमध्ये परस्पर रवाना केले होते. मी पोहोचण्यापू्र्वीच हे केलं होतं, परंतु मी पोहोचल्यानंतर त्यांना एक रूपयाही काढता आला नाही. अतिरिक्त पोलीस आयुक्त तेथे आले होते, त्यांचं काहीही म्हणणं होतं. जप्त झालेले पैसे सरकारी तिजोरीत जमा केले जातील, यथावकाश हडप करतील असं गोटे यांनी म्हटलंय.