मुलीचं लग्न करायला आई निघाली पण स्वतःच जावयाच्या प्रेमात पडली अन् पुढे.. वाचा अनोख्या विवाहाची स्टोरी

मुलीचं लग्न करायला आई निघाली पण स्वतःच जावयाच्या प्रेमात पडली अन् पुढे..  वाचा अनोख्या विवाहाची स्टोरी

Uttar Pradesh News : उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथून एक (Uttar Pradesh News) चमत्कारिक घटना समोर आली आहे. एक 45 वर्षीय विधवा महिला तिच्या मुलीच्या लग्नासाठी मुलाचा शोध घेत होता. पण नंतर असं काही घडलं की या मु्लीची आईच होणाऱ्या जावयाच्या प्रेमात पडली आणि त्याच्याशी लग्नही केलं. या अनोख्या विवाहात आणखी एक खास बात म्हणजे मुलीने आपल्या आईची साथ दिली. या नवविवाहित जोडप्याला वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छाही दिल्या. या खास लग्नाची बातमी फुटताच खळबळ उडाली. आता शाहजहांपूरमध्ये याच विवाहाची खुसखुशीत चर्चा सुरू आहे.

खरंतर हा अनोखा किस्सा देवकाली अंतर्गत रमस्तपूर गावातील आहे. महिलेच्या पतीचे निधन होऊन तीन वर्षे उलटली होती. तेव्हापासून महिला आपल्या मुलीसह राहत होती. मुलगी विवाह योग्य होताच या महिलेने मुलीसाठी नवरा मुलाची शोधाशोध सुरू केली. अनेक ठिकाणची स्थळे पाहिली परंतु, लग्न काही जमलं नाही. यानंतर ही महिला शाहजहांपूर जवळील एका गावात गेली होती. येथील एक मुलगा तिच्या नजरेत भरला. आपल्या मुलीसाठी हा मुलगा योग्य राहील असे तिला वाटले. नंतर पुढे लग्नाच्या बोलाचाली होऊन या युवकाशी मुलीचं लग्न नक्की केलं. नंतर महिलेने मुलाचा मोबाइल नंबर घेतला आणि दोघांत संपर्क सुरू झाला. हळूहळू या संपर्काचं मैत्रीत आणि पुढे प्रेमात रुपांतर झालं.

Video : भारताची राष्ट्रीय भाषा कोणती?; DMK नेत्या कनिमोझींच्या उत्तराने स्पेनमध्ये टाळ्यांचा कडकडाट

यानंतर या कहाणीत खरा ट्विस्ट आला. महिलेने आपल्या मुलीऐवजी स्वतःच लग्नाची बोलणी सुरू केली. आश्चर्य म्हणजे या युवकानेही कोणतेही आढेवेढे न घेता या लग्नाला होकार दिला. नंतर ज्यावेळी महिलेने मुलीला हा सगळा प्रकार सांगितला. तेव्हा काही वेळ मुलीला धक्का बसला. पण आईच्या भावनांचा विचार करून तिने आईला साथ देण्याचा निर्णय घेतला. तिने स्वतःच या लग्नासाठी आईला प्रोत्साहन दिलं. नंतर आईनंही ठरवलं आणि काही दिवसांपूर्वी शाहजहांपूर येथील एका मंदिरात हा अनोखा विवाह संपन्न झाला.

लग्नानंतर नवविवाहित जोडपं गावात आलं तेव्हा गावकरी चकीतच झाले. मुलीच्या लग्नासाठी म्हणून फिरत असलेली आईच लग्न करुन येईल यावर कुणाचाच विश्वास बसत नव्हता. काही लोकांनी या लग्नाला समाजाच्या मान्यतेच्या विरोधात सांगितलं आणि आक्षेप घेतला. परंतु, काही लोकांनी मात्र महिलेची हिंमत आणि साहसिक निर्णयाचं कौतुक केलं. आता हा विवाह आसपासच्या गावांत चांगलाच चर्चिला जात आहे.

नागरिकांनो, EPFO, टॅक्स अन् HDFC बँकेचे 4 मोठे नियम होणार लागू; जाणून घ्या सर्वकाही

follow us
  • fb
  • instagram
  • youtube