Download App

सध्या नारळ स्वस्त, कोणीही पोतंभर नारळ फोडा; श्रेयवादावरुन सुजय विखेंचा अजब सल्ला

Sujay Vikhe Patil : सध्या नारळ स्वस्त आहेत, कोणीही पोतंभर नारळ फोडा असा अजब सल्ला भाजपचे खासदार सुजय विखे पाटलांनी(Sujay Vikhe Patil) विरोधकांना दिला आहे. नगर दक्षिण मतदारसंघात विविध विकासकामांचं उद्घाटन सुजय विखे यांच्या हस्ते करण्यात येत आहे. त्यावरुनच श्रेयवादाचा प्रश्न समोर आला आहे. श्रेयवादावर बोलताना सुजव विखेंनी विरोधकांवर टोलेबाजी केली आहे.

‘दबावाखाली निर्णय घेणार नाही’; ‘वेळकाढूपणा’ म्हणणाऱ्यांना नार्वेकरांनी सुनावलं

सुजय विखे यांच्या हस्ते कर्जत-जामखेडसह पारनेर तालुक्यातील विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात येत आहे. यामध्ये कर्जत-जामखेडमध्ये मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत मंजूर झालेल्या कामांची प्रसिद्धी खासदार विखे यांनी स्वतंत्रपणे केलेली असतानाच पारनेर मतदारसंघात आमदार निलेश लंके यांच्या स्थानिक विकास निधीतून मंजूर झालेल्या कार्यक्रमांचे कार्यक्रमांचा शुभारंभ खासदार विखे यांच्या हस्ते होत आहे.

Commercial LPG Cylinder : सणासुदीत महागाईचा मोठा झटका! LPG गॅसच्या दरात मोठी वाढ

सुजय विखे म्हणाले, राज्यांमध्ये महायुतीचे सरकार आहे. महायुतीतील सर्व लोकप्रतिनिधी हे आपापल्या मतदारसंघांमध्ये निधी आणण्यासाठी प्रयत्न करत असतात. त्यामुळे सर्वच नेते या प्रयत्नांमध्ये असल्याने एकंदरीत पाहिलं तर हे क्रेडिट सरकारचे आहे. त्यामुळे या कामांचं क्रेडिट सरकारमधील सर्वजण घेऊ शकतात. सध्या नारळ स्वस्त आहेत. कोणीही पोतेभर नारळ फोडून उद्घाटन करू शकतो, असा सल्ला सुजय विखे यांनी दिला आहे.

‘किस्से वर्ल्डकप’चे वर्ष 1983! सेलिब्रेशनसाठी उधारीची शॅम्पेन अन् उपाशी खेळाडू…

आगाम निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून मतदारसंघात चाचपणी सुरु करण्यात आली आहे. नगर दक्षिण मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत इच्छुक असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर राष्ट्रवादीच्या आयोजित बैठकीत नगर दक्षिणमधून निलेश लंके याच्या नावाचीच चर्चा असल्याचं सांगितलं जात होतं. त्यामुळे ही जागा राष्ट्रवादीकडेच असल्याने निलेश लंकेच खासदार सुजय विखेंच्या विरोधात उभे असणार असल्याचं दिसून येत आहे.

Mumbai Diaries 2 Trailer: अंगावर शहारा आणणारा ‘मुंबई डायरीज २’चा ट्रेलर आउट 

एकीकडे सुजय विखे यांच्याविरोधात निलेश लंकेच्या नावाची चर्चा असताना आता ठाकरे गटाचे आमदार शंकराव गडाख यांच्या नावाचीही चर्चा असल्याचं समोर येत आहे. कारण 1991 साली बाळासाहेब विखे आणि यशवंत गडाखांमध्ये चुरशीची लढत झाली होती. आत्ताही त्याची पुनरावृत्ती होणार असल्याची चर्चा रंगली आहे. यासंदर्भात शंकरराव गडाख यांची आणि ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यात चर्चा झाल्याचंही बोललं जातयं.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीची रणनीती आखण्यास सुरु असतानाच एकीकडे सुजय विखेंनी विकासकामांचा धडाका सुरु केला आहे. त्यामुळे विरोधकांच्या टीकेचे ते धनी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. या टीकांवरुनच सुजय विखेंनी विरोधकांवर टोलेबाजी केली आहे.

Tags

follow us