Download App

एक हजार कोटींच्या रस्त्याच्या कामाचं लोकार्पण मंत्री गडकरींच्या हस्ते; सुजय विखेंची माहिती

Image Credit: Letsupp

Ahmednagar News : अहमदनगरमधील विळद बायपास ते नगर करमाळा रस्त्याच्या कामाचं लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. उद्या 26 फेब्रुवारी रोजी लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती खासदार डॉ. सुजव विखे पाटील (Sujay vikhe Paitl) यांनी दिली आहे.सुजय विखे अहमदनगर शहरात आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.

जो पहिल्यापासून दिशाहीन, तो पुढची दिशा काय ठरवणार?, भुजबळांचा जरांगेंवर टोला

यामध्ये अहमदनगर बायपास या 41 किमी लांबीच्या रस्त्यासाठी 961 कोटी रुपये, टप्पा क्र.1 मधील अहमदनगर ते घोगरगाव या 38 किमीच्या रस्त्यासाठी 980 कोटी रुपये तर टप्पा क्र.2 मधील घोगरगाव ते जिल्हा हद्द या 41 किमीच्या रस्त्यासाठी 1032 कोटी रुपयांच्या निधीतून सदरील कामे पूर्ण झाली आहेत. यामध्ये टप्पा क्र.1 मध्ये 15 गावांचा आणि टप्पा क्र.2 मध्ये 13 गावांचा समावेश आहे. विशेष म्हणजे केवळ 18 महिन्यातच सदरील काम पूर्ण झाले असल्याची माहिती यावेळी सुजय विखेंनी दिली आहे.

Ajay Barskar : ज्याची संपत्ती 300 कोटी तो 40 लाख का घेईल? बारस्करांचा जरांगेंना थेट सवाल

तसेच या रस्ते विकासामुळे अहमदनगर ते सोलापूर प्रवासादरम्यानचा कालावधी कमी होऊन प्रवास करणे सोयीस्कर होणार आहे. तसेच या रस्त्यांमुळे आर्थिक विकास होऊन रोजगाराच्या संधी देखील निर्माण होतील. यासोबतच शहरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि अहमदनगर जिल्ह्यातील शेतमालाची वाहतूकही अधिक सुखकर होईल असे मत खासदार विखेंनी व्यक्त केले.

राहुल गांधींना झारखंड हायकोर्टाचा मोठा धक्का, रांचीत खटला चालवला जाणार

सदरील रस्त्यांची कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार देखील त्यांनी यावेळी मानले. तसेच अशीच विविध विकासकामे मार्गी लावण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन आणि पाठपुरावा करण्यासाठी सदैव तत्पर असणारे जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे देखील आभार सुजय विखेंनी मानले.

follow us

वेब स्टोरीज