Sudhakar Badgujar News : मागील काही दिवसांपासून मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्तासोबत पार्टी केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांची चौकशी सुरु होती. अखेर चौकशीत उघड झालेल्या बाबींनंतर सुधाकर बडगुजर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सलीम कुत्तासोबत पार्टी करणं बडगुजर यांच्या चांगलच अंगलट आहे.
मोदीचं वर्तन हुकूमशाहासारखं, ईडी-सीबीआयनंतर आता लोकपालही…; आव्हाडांचे टीकास्त्र
सलीम कुत्ता हा मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी असून काही दिवसांपूर्वीच भाजपचे आमदार नितेश राणे यांनी एक कथित व्हिडिओ ट्विट केला होता. या व्हिडिओमध्ये सुधाकर बडगुजर सलीम कुत्तासोबत पार्टी करत असल्याचं दिसून येत होतं. या प्रकरणी हिवाळी अधिवेशनात नितेश राणेंनी चौकशी करण्याची केली. त्यानंतर नाशिक एलसीबीकडून बडगुजर यांची चौकशी सुरु होती. चौकशीत बडगुजर पार्टीत असल्याचं समोर आलं असून काही भेटवस्तूही दिल्या असल्याचं समोर आलं आहे.
इब्राहिम अली खान ते शनाया कपूर ‘हे’ कलाकार दिसणार आगामी प्रोजेक्टमध्ये; पाहा फोटो
सलीम कुत्ता प्रकरणी सत्ताधारी पक्षाच्या इतरही आमदारांकडून बडगुजर यांच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. त्यामुळेच हे प्रकरण नाशिकसह राज्यात चांगलच चर्चेत आलं होतं. आता पोलिसांच्या चौकशीनंतर समोर आलेल्या बाबींवरुन बेकायदेशीर कृत्य आणि प्रतिबंधात्मक कलमांतर्गत आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारखान्यावर षडयंत्र रचले का ? राजेश टोपेंकडून सरकारला प्रत्युत्तर देत थेट आव्हानही
दरम्यान, आधी आरोप करण्यात आल्यानंतर सुधाकर बडगुजर यांची चौकशीच्या मागणीला जोर आला. पोलिसांच्या चौकशीत बाबी समोर आल्यानंतर आता बडगुजर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे सुधाकर बडगुजर यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याची चर्चा सुरु आहे.
दरम्यान, ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्याबरोबर पार्टी केल्याचा गंभीर आरोप भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केला होता. त्यानंतर आडगावमधील फार्महाऊसमधील पार्टीचे काही फोटोही समोर आले होते. त्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची घोषणा केली होती.