कारखान्यावर षडयंत्र रचले का ? राजेश टोपेंकडून सरकारला प्रत्युत्तर देत थेट आव्हानही

  • Written By: Published:
कारखान्यावर षडयंत्र रचले का ? राजेश टोपेंकडून सरकारला प्रत्युत्तर देत थेट आव्हानही

Rajesh Tope On Pravin Darekar Allegation : मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनचे पडसाद अर्थसंकल्पीय अधिवेशनात उमटले. त्यावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार जुंपली. तर भाजपचे प्रवीण दरेकर Pravin Darekar यांनी मनोज जरांगे यांना अटक करून त्यांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी विधानपरिषदेत केली. विधानसभेतही हा मुद्दा आल्यानंतर विधानसभा अध्यक्ष यांनी एसआयटी स्थापन करून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दरेकर यांनी थेट शरद पवार, रोहित पवार व राजेश टोपे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्याला आता शरद पवार गटाचे आमदार राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी प्रत्युत्तर दिले. मी आंदोलन भडकविल्याचा एक टक्का पुरावा दिला तर राजकारणातून संन्यास घेईल, असे आव्हानच राजेश टोपे यांनी केले आहे.

शिवाजीराव आढळराव पाटील CM शिंदेंची साथ सोडणार; तब्बल 20 वर्षांनी ‘राष्ट्रवादीत’ करणार घरवापसी

प्रवीण दरेकर यांनी केलेल्या आरोपांवर राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. टोपे म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी लढा उभारला आहे. त्यांच्या पूर्व इतिहास बघितला तर आरक्षण हे त्यांचे ध्येय आहे. मी पालकमंत्री असतानाही त्यांनी आंदोलने केले आहेत. शंभरहून अधिक दिवस त्यांनी वेगवेगळ्या गावात आंदोलन केले आहेत. त्यांचा कुठलाही पक्षाशी संबंध नाही. तोही हेच सांगत आहे.

अजितदादांकडून मोठ्या घोषणा! जाणून घ्या एका क्लिकवर अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्ट्ये…

आंदोलनकर्त्यांना चहा, नाश्ता याचे सोय केल्याची कबुली देत टोपे म्हणाले, माझ्या कारखान्यापासून आंदोलनाचे स्थळ जवळ होते. त्यामुळे माणुसकीच्या धर्मातून चहा व नाश्ताची सोय केली आहे. परंतु आम्ही संपर्कात नाहीत. सरकारच त्यांच्याशी चर्चा करत होते. मी स्थानिक आमदार म्हणून शिष्टमंडळाबरोबर जात होतो. मराठा आरक्षणाला माझाही पांठिबा आहे. परंतु आंदोलकांना भडकविणे, आंदोलन चिघळविणे, याच्याशी माझ्या कुठलाही संबंध नाही. आंदोलनस्थळावरून माझा साखर कारखाना जवळ आहे. त्यामुळे लोकांना राहण्याची, चहा नाष्टाची माणुसकी म्हणून मदत केली. माझ्यावर कट रचल्याचा आरोप चुकीचे व बिनबुडाचे आहेत. एसआयटी चौकशी होऊ द्या. त्यात दूध का दूध व पाणी का पाणी होऊन जाईल. यामध्ये माझा एक टक्का संबंध आढळला तरी मी राजकारणातून संन्यास घेईल, असे टोपे म्हणाले.

आम्ही कधी मुंगी मारली नाही : टोपे
आमच्यावर आंदोलकांना भडकविण्याचा गंभीर आरोप केला जात आहे. परंतु आमचा डीएनए काय आहे हे सर्वांना माहिती आहे. आम्ही कधी मुंगीही मारली नाही. आंदोलनकर्त्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज झाल्यानंतर मी घटनास्थळी स्थानिक आमदार म्हणून गेलो होते. त्या ठिकाणी जखमी नागरिकांना हॉस्पिटल मिळवून देणे, त्यांच्यावर उपचार करणे, यासाठी मी गेलो होतो.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube