Pravin Darekar : ‘शरद पवार सत्तेबाहेर असतात, तेव्हाच दंगली होतात; विरोधकच दंगलींना जबाबदार’

Pravin Darekar : ‘शरद पवार सत्तेबाहेर असतात, तेव्हाच दंगली होतात; विरोधकच दंगलींना जबाबदार’

Pravin Darekar on Sharad Pawar : गेल्या काही दिवसांपासून राज्यात धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या घटना घडत आहेत. 2 दिवसांपूर्वी शिवराज्यभिषेक दिनाच्या दिवशी कोल्हापूरमध्ये औरंगजेबचा (Aurangzeb) फोटो स्टेट्सला ठेवल्यानं राज्याच्या बहुतांश भागात तणावाचे वातावरण आहे. त्याआधी समनापूर, शेवगाव, अकोला या ठिकाणी दंगली झाल्यात. त्यावरून आरोप-प्रत्योरोप होत आहेत. विरोधक सत्ताधारी सरकारला जबाबदार धरत आहेत. अशातच आज भाजपचे नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी मोठं विधानं केलं. जेव्हा जेव्हा शरद पवार (Sharad Pawar) सत्तेबाहेर असतात, तेव्हा तेव्हा दंगली होतात, असं वक्तव्य केलं. (Pravin Darekar said When Sharad Pawar is out of power, riots happen only)

दोन दिवसाआधी प्रसारमाध्यमांशी बोलतांना शरद पवार यांनी राज्यातील दंगलीच्या वाढत्या घटनांवरून शिंदे-फड़णवीस सरकारवर टीका केली होती. या घटना जाणूनबुजून केल्या जात आहेत. राज्य सरकार अशा घटनांना प्रोत्साहन देत असल्याचा थेट आरोप त्यांनी केला होता. याला आता दरेकरांनी प्रत्युत्तर दिला. दरेकर यांनी सांगितलं की, या सगळ्याच प्रकरणाची चौकशी होण्याची आवश्यकता आहे. कारण जेव्हा जेव्हा शरद पवार किंवा कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस सत्तेबाहेर राहिला, तेव्हाच दंगली झाल्याचा इतिहास आहे. या दंगलींना विरोधी पक्षच जबाबदार आहे, असं दरेकर म्हणाले.

केसीआर उडवणार धमाका; 8 माजी आमदार पक्षात दाखल; आणखी 10 लागले गळाला

ते म्हणाले, कुठलाही पक्ष सत्तेत असतो, तेव्हा सत्ताधारी पक्ष दंगली घडवत नसतो. कारण, दंगली झाल्या तर ते त्या सरकारचं अपयश असतं. मग आम्ही सत्तेत असतांना दंगली कशाला घडवू? असा सवाल त्यांनी केला. सत्ताधारी दंगली घडवत नसतात. मग तरीही दंगली होत आहेत. त्यामुळं राज्यात होणाऱ्या दंगली कोणी रजाकीय उद्देशाने घडवत आहे का, याची चौकशी होणं गरजेचं आहे. राज्यात दंगली घडवून गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केविलवाणा प्रयत्न केला जातोय. फडणवीस कठोर आहेत. ते कोणाचाही मुलाहिजा न ठेवता संबंधितांवर कारवाई करतील. ते राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडू देणार नाही, असा आम्हाला विश्वास आहे.

शरद पवार यांनी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर राज्यातील नेत्यांना धमक्या येणं हे सरकारचं अपयश आहे, असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. त्याविषयी विचारले असता, दरेकर म्हणाले की, जितेंद्र आव्हाड आणि सतेज पाटील यांनी यापूर्वी सांगितले की, राज्यात दंगली होणार आहेत. त्यांनी ट्विटही केले होते. आव्हाड-पाटील यांना होणाऱ्या दंगलींची कल्पना होती, याचा अर्थ त्या दिशेने शोध झाला पाहिजे, असं सांगत इशारा दिला.

पुढे ते म्हणाले की, पवारांना आलेल्या धमक्यांची चौकशी निश्चित होईल. त्या धमक्या खोट्या आहेत का, या धमक्यांत काही राजकारण आहे का, याची चौकशी होईल. जर खरोखर गंभीर धमक्या असतील तर निश्चितच कारवाई होईल. कारण, शरद पवार हे मोठे नेते आहेत.

संजय राऊतांना आलेल्या धमकीविषयी विचारले असता, ते म्हणाले, संजय राऊतांना कोण कशासाठी धमकी देईल? मला वाटत नाही, राऊतांना धमकी आली असेल. ते प्रसिध्दीच्या झोतात राहण्यासाठी धमकी आल्याचं सांगत आहेत, असं दरेकर म्हणाले.

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube